One crore new investors joins BSE in last 107 days Dainik Gomantak
अर्थविश्व

BSE ने जोडले एक कोटी नवीन गुंतवणूकदार

देशातील अग्रणी स्टॉक एक्सचेंज BSE ने 6 जून ते 21 सप्टेंबर या 107 दिवसात एक कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांना (Investors) आपल्या व्यासपीठावर जोडले आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील अग्रणी स्टॉक एक्सचेंज BSE ने 6 जून ते 21 सप्टेंबर या 107 दिवसात एक कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांना (Investors) आपल्या व्यासपीठावर जोडले आहे. अशा प्रकारे BSE च्या एकूण गुंतवणूकदारांची संख्या आठ कोटींच्या पुढे गेली आहे. या वर्षी 6 जून रोजी एक्सचेंजने म्हटले होते की, त्याच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 70 दशलक्षांचा टप्पा ओलांडला आहे. 23 मे 2020 ते 6 जून 2021 दरम्यान बीएसईने दोन कोटी गुंतवणूकदारांची भर घातली आहे.(One crore new investors joins BSE in last 107 days)

या कामगिरीवर बीएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान म्हणाले, “इक्विटी गुंतवणूक (मग ती इक्विटी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये) गेल्या दीड वर्षात वाढली आहे. देशांतर्गत बाजारपेठही जागतिक ट्रेंडचे अनुसरण करत आहे.

आशियातील सर्वात जुन्या एक्सचेंजच्या प्रमुखांनी गुंतवणूकदारांना बाजारात प्रवेश करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एक्सचेंजने गुंतवणूकदारांना ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे त्याबद्दल पुरेशी माहिती मिळवायला सांगितले आहे.

सेन्सेक्स पुन्हा पडला

सकाळी 11:34 वाजता बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 104.41अंकानी खाली येऊन 58,900.86 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात सेन्सेक्स 59,005.27 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.

एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, टाटा स्टील आणि एशियन पेंट्स या साऱ्या कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये खाली येताना पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे टेक महिंद्रा, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, इन्फोसिस, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एनटीपीसी, पॉवरग्रीड, मारुती, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, सेन्सेक्सवरील टायटन आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT