Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: 3 राज्यांच्या घोषणेनंतर जुन्या पेन्शनवर मोठी अपडेट, अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी

Modi govt: राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Nirmala Sitharaman: जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरु लागली आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय गुजरात निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी सत्तेत आल्यास जुनी पेन्शन बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात, कामगार संघटनांनी सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जुनी पेन्शन प्रणाली (OPS) पुनर्संचयित करण्याची तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक विश्वासार्ह सामाजिक सुरक्षा संरचना तयार करण्याची मागणी केली.

अर्थसंकल्पासंदर्भातील तुमच्या मागण्या ई-मेलवर टाका

दहा कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने अर्थ मंत्रालयाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये पुढील अर्थसंकल्पाबाबत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मात्र, या संघटनांनी अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी सरकारने बोलावलेल्या ऑनलाइन बैठकीला हजेरी लावली नाही. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात, OPS रद्द करुन जानेवारी 2004 पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) लागू करण्यात आली. NPS ही अंशदान आधारित पेन्शन योजना असून त्यात महागाई (Inflation) भत्त्याची तरतूद नाही.

ऑनलाइन बैठक

एनपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना कमी पेन्शन मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर कामगार संघटनांनी ओपीएसचीच पुन्हा अंमलबजावणी करण्याची मागणी तीव्र केली आहे. कामगार संघटनांच्या मंचाने म्हटले की, 'सरकारने (Government) एनपीएसऐवजी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी.'

दुसरीकडे, ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटरचे (TUCC) सरचिटणीस एसपी तिवारी, जे बजेटपूर्व सल्लागार बैठकीला उपस्थित होते, ते म्हणाले की, 'बैठकीत एनपीएसऐवजी ओपीएस पुनर्संचयित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पेन्शनची रक्कम 1000 रुपयांवरुन 5000 रुपये करण्याची मागणीही करण्यात आली.'

भारतीय मजदूर संघ (बीएमएस) ने म्हटले की, 'पेन्शनची रक्कम वाढवण्याव्यतिरिक्त, ते महागाई भत्त्याशी देखील जोडले जावे जेणेकरुन पेन्शनधारकांना आपल्या गरजा पूर्ण करता येतील.' बीएमएसने असंघटित क्षेत्रांना अधिक निधी देण्याची मागणीही सरकारकडे केली आहे. याशिवाय अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन योजनांशी निगडित कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनातही वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT