Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी ! जुनी पेन्शन योजना झाली लागू

Old Pension Scheme News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

Old Pension Scheme News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. पंजाब सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घोषणा केली. त्याचा लाभ राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने आश्वासन दिले होते आणि ते आम्ही पूर्ण केले आहे.

योजना आधीच तयार केली होती

विशेष म्हणजे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. सुमारे महिनाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंजाब सरकारने कर्मचाऱ्यांसाठी (Employees) जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे, राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनीही कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय मिळायला हवा, असे म्हटले होते. आता सरकारच्या (Government) घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Money
Pension System: पेन्शनबाबत सरकारने सांगितली मोठी गोष्ट, लाखो लोकांचे बल्ले-बल्ले

NPS वर OPS चा फायदा

प्रत्यक्षात जुनी पेन्शन योजनेबाबत राज्यस्तरावर सातत्याने आंदोलने सुरु होती. यापूर्वी राजस्थान आणि छत्तीसगड (Chhattisgarh) सरकारनेही जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. 2010 नंतर सरकारने नवीन पेन्शन स्कीम (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या योजनेत कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेच्या तुलनेत फारच कमी लाभ मिळतात. याअंतर्गत निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशावर सरकारला कर भरावा लागणार आहे.

Money
Pension News: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! Life Certificate सादर करण्याचे बदलले नियम

जाणून घ्या जुन्या पेन्शनचे 2 मोठे फायदे

जुन्या पेन्शन योजनेत महागाई दर वाढल्याने डीए (महागाई भत्ता) देखील वाढला होता.

सरकार जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हा ते पेन्शन देखील वाढवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com