Ola electric Scooter Dainik Gomantak
अर्थविश्व

Ola Electric Scooter: एकाच चार्जमध्ये चालणार 150 किमी; गाडीची होणार Home Delivery

OLAचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल ट्विटरवरुन Electric स्कूटरबद्दल लोकांच्या मागण्या काय आहेत हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करताना दिसता आहेत.

दैनिक गोमन्तक

ओला इलेक्ट्रिक स्कूटर (OLA Electric Scooter) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने या दमदार इलेक्ट्रिक स्कूटरला उत्तम फिचर्स देण्यात आले केले आहेत. तसेच योग्य राईडिंग रेंजसह येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर डीलरशिपला नाही तर थेट प्रोडक्शन प्लांटमधून ग्राहकांना देण्याचा विचार कंपणी करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता किंमतींमधील फरक दूर करण्यासाठी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे ग्राहकांना वारंवार डीलरशिपला जावे लागणार नाही.

OLAचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सला विचारले की त्यांना ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये जायचे आहे की ऑनलाईन खरेदी करून घरी पाहीजे आहे. याला उत्तर देताना, बहुतांश लोकांनी त्यांना स्कूटर ऑनलाईन माध्यमातून खरेदी करुन थेट घरी पाहिजे आहे. त्यांच्या या प्रश्नावर सुमारे 4,500 लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

OLAने इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग फक्त 499 रुपयांपासुन सुरू केली आहे, त्यानंतर पुढच्या 24 तासात 1 लाखांहून अधिक ग्राहकांनी बुकिंग केली. अधिकृत दाव्यानुसार, ओला स्कूटर फक्त 18 मिनिटांत 0 ते 50% पर्यंत चार्ज होऊ शकते. तर चार्जिंग रेंज एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंत असेल. म्हणजेच, स्कूटर फक्त 18 मिनिटांच्या चार्जिंगवर 75 किमी पर्यंत चालणार आहे. भारतीय बाजारात ही स्कूटर Ather 450X आणि TVS iQube शी स्पर्धा करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT