SBI चा मान्सून धमाका; 31 ऑगस्ट पासून मिळणार स्वस्त Home Loan

SBI बँकेला अपेक्षा आहे की, ही ऑफर सुरू झाल्यावर रियालीटी सेक्टरमधील घरे आणि फ्लॅटच्या विक्रीत वाढ होईल.
SBI Monsoon Offer
SBI Monsoon Offertwitter/@TheOfficialSBI
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने (SBI) मान्सून ऑफर सुरू केली आहे. बँकेने या ऑफर अंतर्गत गृहकर्जाचे (Home Loan) प्रक्रिया शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. यानुसार ग्राहकांना बँक फी मध्ये 100% सवलत मिळणार आहे. या काळात बँक गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकाकडून प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. बँकेच्या गृहकर्जाचा सध्याचा दर 6.7 टक्के आहे.

एसबीआयचे एमडी सी.एस. शेट्टी म्हणाले की, बँकेने ही ऑफर सुरू करून ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेला अपेक्षा आहे की, ही ऑफर सुरू झाल्यावर रियालीटी सेक्टरमधील घरे आणि फ्लॅटच्या विक्रीत वाढ होईल.

SBI Monsoon Offer
Covid emergency response package: केंद्राने राज्यांना दिले 1827 करोड रुपये

बँकेने यापूर्वी जानेवारीमध्ये कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याची ऑफर सुरू केली होती. एसबीआयच्या मते, कर्जाच्या परतफेडीचे चांगले रेकॉर्ड असलेल्या ग्राहकांना स्वस्त कर्ज देणे आवश्यक आहे. एसबीआयने आपल्या गृहकर्जाचे व्याज दर CIBILशी जोडले आहेत आणि 30 लाख रुपये आणि त्यावरील कर्जासाठी व्याज दर खूप कमी आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, देशातील आठ शहरांमध्ये 5 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज दिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com