okinawa electric scooter dealership fire incident showroom burns down to ashes  Dainik Gomantak
अर्थविश्व

17 इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक, बॅटरी चार्ज होताना घडली घटना

सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक

दैनिक गोमन्तक

उन्हाळा सुरू होताच इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना एकामागून एक समोर येत आहेत. यावेळी नुकत्याच घडलेल्या घटनेत, इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ओकिनावा ऑटोटेकच्या शोरूममध्ये आग लागली, ज्यामध्ये 17 इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) जळून खाक झाल्या. (okinawa electric scooter dealership fire incident showroom burns down to ashes)

बॅटरी चार्ज करताना आग

ही घटना तामिळनाडूची आहे. पोरूर-कुंदरातूर येथील शोरूममध्ये एका ग्राहकाने आपल्या ई-बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी ठेवली होती, त्याला काही वेळातच आग लागली. हळूहळू संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झाले.

यामध्ये 5 नवीन इलेक्ट्रिक (Electric) स्कूटर आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संपूर्ण शोरूमध्ये धुराचे लोट

आग लागल्यानंतर शोरूममधून धुराचे लोट उठू लागले, जे पाहून लोक घाबरले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक जमा झाल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर पोलिसांच्या (Police) मदतीने जमाव हटवण्यात आला. मात्र, आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र त्यापूर्वीच संपूर्ण शोरूम जळून खाक झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT