खरगोन हिंसाचाराचा पहिला बळी, डोक्यावर गंभीर इजा झाल्याने तरुणाचा मृत्यू

जातीय हिंसाचाराचा पहिला मृत्यू, गृहमंत्र्यांनी दिली माहिती
madhya pradesh indore khargone violence ibris khan died in indore hospital home minister confirmed the first death in the case was missing for several days
madhya pradesh indore khargone violence ibris khan died in indore hospital home minister confirmed the first death in the case was missing for several daysDainik Gomantak

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात पहिल्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. इब्रिस खानचा इंदूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इब्रिस खान 10 एप्रिलपासून बेपत्ता होता. राज्याचे गृहमंत्री (Home Minister) नरोत्तम मिश्रा यांनी हिंसाचारामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची माहिती दिली आहे. त्याचबरोबर इब्रिस खानच्या भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (madhya pradesh indore khargone violence ibris khan died in indore hospital home minister confirmed)

इब्रिस खानचा भाऊ इखलाक खान यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “मी माझ्या भावाचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आलो आहे.

madhya pradesh indore khargone violence ibris khan died in indore hospital home minister confirmed the first death in the case was missing for several days
लाखो क्रोम वापरकर्ते अडचणीत! गुगलने दिला इशारा

माझा भाऊ आनंदनगर मशिदीत उपवास सोडण्यासाठी गेला होता आणि तिथे हल्ला झाला आणि त्याला तेथील लोकांनी आणि पोलिसांनी खूप मारहाण केली. पोलिसांनी (police) माझ्या भावाला तेथून सर्वांसमोर उचलले होते आणि तो काही काळ पोलिस स्टेशनमध्ये होता आणि तेव्हापासून बेपत्ता होता. त्याला ओढत नेण्यात आले असून त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत."

जातीय हिंसाचारातील पहिल्या मृत्यूची (Death) माहिती देताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, “रविवारी रात्री इंदूरमधील एमवाय हॉस्पिटलमध्ये 30 वर्षीय इब्रिस खान उर्फ ​​सद्दामच्या मृतदेहाची ओळख पटली. काल रात्री मृतदेहाची ओळख पटल्याने आठ दिवसांनंतर मृत्यूची नोंद झाली आहे. 10 एप्रिल रोजी रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. 7-8 अज्ञात लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com