NPS Withdrawal Facility: पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही NPS चा फायदा घेत असाल तर आता सरकारने त्याचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही एक प्रकारची गुंतवणूक (Investment) योजना आहे. या योजनेंतर्गत खातेदारांना निवृत्तीनंतर दरमहा एकरकमी रक्कम आणि पेन्शनचा लाभ मिळतो.
दरम्यान, NPS मध्ये निवृत्तीपूर्वी पैसे काढण्याची तरतूद नाही, परंतु तुम्ही काही नियमांनुसार पैसे काढू शकता. याबाबतची माहिती पीएफआरडीएने दिली आहे. PFRDA ने यावर्षी NPS मधून आंशिक पैसे काढण्याबाबत काही नवीन नियम बदलले आहेत.
तसेच, 1 जानेवारी 2023 नंतर आंशिक पैसे काढण्यासाठी, तुम्हाला संबंधित नोडल ऑफिसरकडे अर्ज करावा लागेल. याशिवाय तुम्ही ऑनलाइनही अर्ज करु शकता. या सुविधेचा लाभ फक्त NPS खातेधारक, केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांना मिळत आहे.
सध्या, नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) चे सदस्य 60 वर्षांनंतर एकरकमी म्हणून 60 टक्के सेवानिवृत्ती कॉर्पस काढतात, तर उर्वरित 40 टक्के कॉर्पस अनिवार्यपणे 'वार्षिक' (निश्चित रक्कम दरवर्षी अदा केली जाते.) आत जातो.
तर पद्धतशीर पैसे काढण्याची योजना NPS सदस्यांना वयाच्या 75 वर्षापर्यंत नियतकालिक पैसे काढण्याची निवड करण्यास अनुमती देईल. सदस्य मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पैसे काढण्याची निवड करु शकतात.
PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, NPS मधून पैसे काढण्याची वेळ मर्यादा T4 वरुन T2 करण्यात आली आहे. म्हणजेच आता पैसे काढण्याची प्रक्रिया 4 दिवसांऐवजी केवळ 2 दिवसांत पूर्ण होणार आहे.
>> तुम्ही NPS खात्यातून पैसे काढायला गेलात, तर तुम्ही फक्त तीन वेळाच काढू शकता.
>> तुम्ही एकूण योगदानाच्या फक्त 25 टक्केच काढू शकता.
>> नॅशनल पेन्शन सिस्टिममधून मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न (Marriage), फ्लॅट खरेदी व बांधकाम, गंभीर आजार यासाठी अंशत: पैसे काढता येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.