National Pension Scheme : 'या' योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा दरमहा 50,000 पेन्शन

नॅशनल पेन्शन सिस्टम ठरु शकतो सर्वोत्तम पर्याय
Pensioners
PensionersDainik Gomantak
Published on
Updated on

नोकरदार वर्गाकडे निवृत्तीनंतरच्या बचतीसाठी अनेक पर्याय असतात. यासाठी अनेक प्रकारच्या योजना देखील आखल्या जातात. काही लोक आपल्या पगाराचा काही भाग गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवतात. काही लोक निवृत्तीसाठी बचत करतात जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पार्श्वभूमीवर तुम्हाला पेन्शनसाठी सेवानिवृत्ती निधी तयार करायचा असेल, तर नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.

(what is national pension scheme and how to open account know details)

मिळालेल्या माहितीनुसार खाजगी नोकरी शोधणाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार एक योजना चालवते. या योजनेचे नाव राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. जर तुम्ही या योजनेत योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. तुम्हाला एवढी पेन्शन कशी मिळेल? 50 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा किती पैसे गुंतवावे लागतील? याची माहिती आम्ही येथे देणार आहोत.

Pensioners
Pension Plans: 'या' योजनेत पैसे गुंतवा,अन् राहा टेन्शन फ्री,काय आहेत योजनेचे फायदे

50,000 रुपये पेन्शन कसे मिळवायचे

निवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर अशा प्रकारे गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला वयाच्या 24 व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात करावी लागेल. तुम्हाला दरमहा 6000 रुपये जमा करावे लागतील. त्यानुसार तुम्हाला दररोज 200 रुपये वाचवावे लागतील. जर त्याने NPS मध्ये 36 वर्षे अशी गुंतवणूक केली तर त्याची एकूण NPS गुंतवणूक 10 % वार्षिक दराने मॅच्युरिटीवर 2,54,50,906 रुपये होईल.

Pensioners
INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या एकूण निधीपैकी 40 % वार्षिकी खरेदीवर खर्च केला तर त्याला निवृत्तीनंतर दरमहा 50,902 रुपये पेन्शन मिळेल. जर एखाद्याला निवृत्तीनंतर 75 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवायचे असेल तर त्याला दरमहा 10 हजार रुपये एनपीएसमध्ये गुंतवावे लागतील.

याचा विचार करा की 25 वर्षांची व्यक्ती पुढील 35 वर्षे NPS मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवते. 10 % वार्षिक परताव्यावर, मॅच्युरिटीवर त्याची एकूण NPS गुंतवणूक 3,82,82,768 रुपये असेल. जर त्याने त्याच्या एकूण निधीपैकी 40% वार्षिकी खरेदीवर खर्च केला, तर त्याला निवृत्तीनंतर दरमहा 76,566 रुपये पेन्शन मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com