IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

IndiGo flight cancellations: इंडिगो एअरलाइन्सच्या सतत रद्द होणाऱ्या आणि विलंबाने होणाऱ्या उड्डाणांमुळे हजारो प्रवासी प्रभावित झाले आहेत.
IndiGo Crisis
IndiGo CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: इंडिगो एअरलाइन्सच्या सतत रद्द होणाऱ्या आणि विलंबाने होणाऱ्या उड्डाणांमुळे हजारो प्रवासी प्रभावित झाले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आज शनिवारी इंडिगोला स्पष्ट आदेश दिले असून रविवारी सायंकाळपर्यंत सर्व रह झालेल्या उड्डाणांचे तिकीट रिफंड पूर्ण करावेत, असे निर्देश दिले आहेत. रिफंड प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा आदेशांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.

शुक्रवारी इंडिगोने एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द केली होती. आज शनिवारी सलग पाचव्या दिवशीही उड्डाणांचा गोंधळ कायम राहिला, त्यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा आणि मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सर्व रद किंवा बाधित उद्वाणांसाठी रिफंड प्रक्रिया रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रवाशांचे पैसे वेळेत परत मिळतील आणि त्यांना अधिक मानसिक त्रास होणार नाही.

IndiGo Crisis
Goa ZP Election: सासष्टीत भाजपकडून 3 च उमेदवार! 6 जागांवर अपक्षांना पाठिंबा; दक्षिण गोव्यात लढवणार 18 जागा

उड्डाणे रद्द किंवा विलंब झाल्यामुळे जे साहित्य प्रवाशांच्या ताब्यात पोहोचले नाही, ते पुढील ४८ तासांच्या आत संबंधित प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही मंत्रालयाने दिले आहेत, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक वस्तूंअभावी प्रास सहन करावा लागू नये. प्रभावित प्रवाशांकडून पुनर्निर्धारणासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

यामुळे प्रवाशांवर कोणतेही आर्थिक ओझे पडणार नाही. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी विमानतळांवर आणि अन्य ठिकाणी विशेष मदत व रिफंड सुविधा केंद्रे उभारण्याचेही आदेश इंडिगोला देण्यात आले आहेत.

स्वयंचलित रिफंड प्रणाली सुरु राहणार ओपर्यंत इंडिगोचे उड्डाण संचालन पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत स्वयंचलित रिफंड प्रणाली कार्यरत ठेवण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.

त्यामुळे प्रयाशांना रिफंडसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर इंडिगोने रिफंड व साहित्य वितरणासंद‌र्भातील आदेशांचे पालन केले नाही, तर तर कंपनीविरोधात कारवाई केली जाईल. प्रवाशांचे हित आणि त्यांना त्वरित दिलासा देणे हाच सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे

IndiGo Crisis
Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

गोव्याच्या पर्यटनावर मोठा परिणाम

गोव्यातील दाबोळी विमानतळावरून आज शनिवारी इंडिगोची १४ देशांतर्गत उड्डाणे सह करण्यात आली. ज्यामुळे अनेक प्रयासी अडकून पडले आणि राज्याच्या व्यस्त पर्यटन हंगामावर त्याचा विपरित परिणाम झाला. शेवटच्या क्षणी उड्डाणे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे अनेक प्रवासी विमानतळाबाहेर ताटकळत उभे राहिले.

काल शुक्रवारीसुद्धा इंडिगोची गोव्यातील ३८ पैकी ३१ उड्डाणे रह झाल्याचे सांगण्यात आले. एका दिवसभरात १९ उहाणेही होऊ शकली नसल्याचे येथील प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com