VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Virat Kohli Kuldeep Yadav romantic Couple Dance: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान, विराट कोहली आणि कुलदीप यादव मैदानावर 'कपल डान्स करताना पाहायला मिळाले.
Virat Kohli Kuldeep Yadav romantic Couple Dance
Virat Kohli Kuldeep Yadav romantic Couple DanceDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात मैदानावरील खेळीइतकीच एक धमाल घटना चर्चेत राहिली. विराट कोहली आणि कुलदीप यादव यांनी घेतलेल्या विकेटनंतर केलेल्या ‘कपल डान्स’चा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या अनोख्या सेलिब्रेशनला भरभरून दाद दिली.

६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकत मोठी चर्चा निर्माण केली. कारण टीम इंडियाने यापूर्वी वनडेमध्ये टॉस जिंकला होता तो २०२३ विश्वचषकातील वानखेडेवरील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात. त्यामुळे टॉस जिंकल्यापासूनच भारतीय संघाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, डावातील ४२.३ व्या षटकात कुलदीप यादवने कॉर्बिन बॉशला बाद करून दक्षिण आफ्रिकेची मोठी आशा संपुष्टात आणली. बॉश ३०० पेक्षा जास्त धावांच्या दिशेने संघाला नेऊ शकतो अशी अपेक्षा होती, पण तो गुगलीवर चुकीचा फटका मारत थेट कुलदीपच्या हाती झेल देऊन तंबूत परतला.

हाच झेल घेतल्यानंतर कुलदीप कोहलीकडे धावत गेला आणि कोहलीने त्याचा हात धरत दोघांनी मैदानातच साल्सा स्टाईलमध्ये ‘कपल डान्स’ केला. प्रेक्षकांनीही या क्षणाला जोरदार प्रतिसाद दिला.

Virat Kohli Kuldeep Yadav romantic Couple Dance
Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

कुलदीप यादवने या सामन्यात आपली फिरकीची जादू पुन्हा एकदा दाखवत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. केवळ ४.१० च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत त्याने देवाल्ड ब्रुविस, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश आणि लुंगी एनगिडी यांना बाद केले. मध्यंतरातील या विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या मोठी करण्याची संधी गमावली.

Virat Kohli Kuldeep Yadav romantic Couple Dance
Goa ZP Election: सासष्टीत भाजपकडून 3 च उमेदवार! 6 जागांवर अपक्षांना पाठिंबा; दक्षिण गोव्यात लढवणार 18 जागा

सामन्यादरम्यान कोहली आणि कुलदीपचा हा अनोखा सेलिब्रेशन क्षण सध्या सर्वत्र चर्चेत असून चाहत्यांनी त्याचे भरपूर कौतुक केले आहे. क्रिकेटच्या तणावपूर्ण वातावरणातही खेळाडूंच्या आनंदी सेलिब्रेशनने सामन्यात वेगळाच रंग भरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com