Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

German national found dead in Goa: खालचावाडा येथील आरएन गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी (ता.६ डिसेंबर) एका परदेशी नागरिकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

हरमलम: खालचावाडा येथील आरएन गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी (ता.६ डिसेंबर) एका परदेशी नागरिकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख सर्गेज पाचोमोव्ह अशी झाली असून तो जर्मनीचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमल येथील खालचावाडा भागातील आरएन गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक २०२ मध्ये राहत होता. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुपारी साधारण १:४९ वाजता पोलिसांना एक निनावी फोन आला ज्यामध्ये जर्मन नागरिक मृतावस्थेत आढळल्याचे कळवण्यात आले.

Goa Crime
Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

यानंतर एलपीएसआय अर्चना शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोलीची पाहणी केल्यानंतर सर्गेज पाचोमोव्हचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळला. प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Goa Crime
Goa Government Job: गोव्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! शासकीय विभागातील 230 पदे भरली जाणार; कसा कराल अर्ज? वाचा..

प्राथमिक तपासात घातपाताचे कोणतेही ठोस संकेत पोलिसांना आढळले नसून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पाचोमोव्हच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी पोलिसांनी दूतावास आणि इतर माध्यमांद्वारे प्रयत्न सुरू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com