Medicine Dainik Gomantak
अर्थविश्व

NPPA: 84 औषधांवरील किंमत केल्या निश्चित; फसवणुक केल्यास व्याजासह केले जाणार वसूल

फार्मास्युटिकल किंमत प्राधिकरणाने सामान्य गरजांशी संबंधित 84 औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

फार्मास्युटिकल किंमत प्राधिकरणाने (NPPA) सामान्य गरजांशी संबंधित 84 औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. याशिवाय NPPA ने लिक्विड ऑक्सिजन आणि ऑक्सिजन इनहेलेशनच्या सुधारित किमतीमध्ये 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ केली आहे. (NPPA fixed prices on 84 drugs Fraud will be recovered with interest)

या एजन्सीचे (NPPA) काम देशातील औषधे आणि फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि बाजारात उपलब्ध करून देणे हे असणार आहे. तसेच कोणत्याही औषध कंपनीने सर्वसामान्यांची जबरदस्तीने फसवणूक केल्यास वेळीच कडक कारवाई करावी लागणार आहे. एनपीपीए ज्या औषधी कंपन्यांची नावे नियंत्रण यादीत नाहीत त्यांचीही देखरेख करते असते.

NAPPA

मध्ये मधुमेह, डोकेदुखी आणि उच्च रक्तदाबाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांचा देखील समावेश आहे. एनपीपीएने जास्त कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स पातळी कमी करण्यासाठी फॉर्म्युलेशनची किंमत देखील निश्चित केली आहे. फार्मास्युटिकल कंपनीने तुमच्याकडून ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारले तर ते वसूल केले जाणार आहे.

नियम काय आहे

किंमत नियंत्रण ऑर्डर-2013 तयार करण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने एक अधिसूचना देखील जारी केली होती. NPPA ने 84 औषधांच्या किरकोळ किमती निश्चित करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केल्याची माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहे.

पॅरासिटामॉल-कॅफीन टॅब्लेट 2.88 रुपये

NPPA ने पॅरासिटामोल आणि कॅफिनची किंमत 2.88 रुपये प्रति टॅबलेट निश्चित केली. याशिवाय एका रोसुवास्टॅटिन ऍस्पिरिन आणि क्लोपीडोग्रेल कॅप्सूलची किंमत 13.91 रुपये निश्चित करण्यात आली. व्होग्लिबोज आणि (SR) मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराईडच्या एका टॅब्लेटची किंमत GST वगळून 10.47 रुपये निश्चित करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT