Now India is second most important country for manufacturing hub Dainik Gomantak
अर्थविश्व

भारत बनला या क्षेत्रात अव्वल, अमेरिकेलाही टाकले मागे

भारत (India) अमेरिकेला (United State) मागे टाकत जगातील दुसरे सर्वात आकर्षक उत्पादन केंद्र बनले आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) अमेरिकेला (United State) मागे टाकत जगातील दुसरे सर्वात आकर्षक उत्पादन केंद्र बनले आहे. रिअल इस्टेट (Real Estate) सल्लागार कुशमन अँड वेकफिल्डने जारी केलेल्या अहवालात हे उघड झाले असून खर्चाच्या आघाडीवर कार्यक्षमतेमुळे उत्पादन केंद्र म्हणून भारताचे आकर्षण वाढले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.अलीकडेच, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले होते की, चीनची (China) नक्कल करून भारत जगातील नवीन उत्पादन केंद्र बनू शकत नाही. जर भारताला या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर त्याला वाढीच्या नवीन उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.(Now India is second most important country for manufacturing hub)

भारताने अमेरिकेला मागे टाकले-

कुशमन अँड वेकफील्डच्या यादीनुसार चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.

कशी आहे देशांची यादी-

चीन,भारत,अमेरिका,कॅनडा, झेक प्रजासत्ताक, इंडोनेशिया, लिथुआनिया, थायलंड, मलेशिया, पोलंड

सरकारी योजनेचा होतोय फायदा-

केंद्र सरकारने देशात उत्पादन वाढवण्यासाठी PLI योजना सुरू केली आहे. याद्वारे, कंपन्यांना भारतात त्यांच्या युनिटची स्थापना आणि निर्यात करण्यासाठी विशेष सवलती तसेच आर्थिक सहाय्य दिले जात आहे. पुढील पाच वर्षांत देशातील उत्पादक कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. यासह, देशातील उत्पादन करून भारताचा आयातीवरील खर्च कमी होईल. जेव्हा देशात वस्तू बनवल्या जातील तेव्हा रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

या योजनेअंतर्गत, परदेशी कंपन्यांना भारतात कारखाने उभारण्यासाठी तसेच घरगुती कंपन्यांना संयंत्र उभारण्यासाठी मदत केली जाईल. ही योजना 5 वर्षांसाठी आहे. यामध्ये कंपन्यांना रोख प्रोत्साहन मिळते. सर्व उदयोन्मुख क्षेत्र जसे की ऑटोमोबाईल, नेटवर्किंग उत्पादने, अन्न प्रक्रिया, प्रगत रसायनशास्त्र, दूरसंचार, फार्मा आणि सौर पीव्ही उत्पादन या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT