डिसेंबर 2022 पर्यंत Air India खाजगी कंपनीच्या हातात

यावर्षी डिसेंबर 2022 पर्यंत एअर इंडिया (Air India) खाजगी हाती देण्याचा सरकारचा निर्धार आहे
Air India sale to private company till December 2022
Air India sale to private company till December 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

यावर्षी डिसेंबर 2022 पर्यंत एअर इंडिया (Air India) खाजगी हाती देण्याचा सरकारचा निर्धार आहे. शिवाय, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCAL) चे देखील निर्गुंतवणूक (Privatization) या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा (Modi Government) मानस आहे.(Air India sale to private company till December 2022)

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (डीआयपीएएम) आशावादी आहे की एअर इंडियाच्या धोरणात्मक गुंतवणुकीसाठी आर्थिक बोलीची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. तसेच, डिपार्टमेंटला अशी अपेक्षा आहे की या वर्षी डिसेंबरपर्यंत एअर इंडियाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती खाजगी कंपनीकडे सोपवली जाईल.

Air India sale to private company till December 2022
NMP: देशातील 400 रेल्वे स्टेशन, 25 विमानतळ, रस्ते खाजगी कंपन्यांच्या ताब्यात

सप्टेंबरपर्यंत आर्थिक बोली-

आम्ही एअर इंडियाच्या आर्थिक बोली सप्टेंबरच्या अखेरीस होतील याची खात्री करत आहोत. डिसेंबरपर्यंत एअर इंडियाला हस्तांतरित करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे विभागातील एका वरिष्ठ सरकारी सूत्राने सांगितले आहे.

या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीलाही वेग-

सरकारी सूत्राने असेही सांगितले आहे की, बीपीसीएलच्या धोरणात्मक गुंतवणूकीवर COVID-19 च्या दुसऱ्या लाटेचा परिणाम झाला असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस आपण त्यात यश पाहू शकतो. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या अन्य सरकारी कंपनीच्या निर्गुंतवणुकीसाठीही योग्य ती पाऊले उचलली जात आहेत.

विशेष म्हणजे, एअर इंडियाच्या धोरणात्मक विक्रीला फेब्रुवारी 2019 मध्ये आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने मंजुरी दिली होती. त्याचप्रमाणे, बीपीसीएल, एससीआय आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निर्गुंतवणुकीला नोव्हेंबर 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली होती . सरकारला या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या विक्री आणि निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com