Azim Premji Dainik Gomantak
अर्थविश्व

टाटा, अदानी, अंबानी नव्हे, या देणगीदाराने केली सर्वाधिक कमाई, केला 'हा' मोठा रेकॉर्ड!

Azim Premji: देशातील सर्वात मोठ्या परोपकारी व्यक्तींपैकी एक असलेल्या अझीम प्रेमजींच्या विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Azim Premji: देशातील सर्वात मोठ्या परोपकारी व्यक्तींपैकी एक असलेल्या अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ट्रेडिंग सत्रात कंपनीने नवीन विक्रमी पातळी गाठली. माहितीनुसार, जुलै 2020 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे काही मिनिटांत सुमारे 32 हजार कोटी रुपयांचा नफा झाला. चला तर मग कंपनीचे शेअर्स सध्या कोणत्या लेव्हलवर ट्रेडिंग करत आहेत आणि शेअर्समध्ये का वाढ दिसत आहे याबद्दल जाणून घेऊया...

तिमाही निकालांमुळे तेजी

विप्रोच्या शेअर्समध्ये (Shares) वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीचे उत्कृष्ट निकाल. प्रत्यक्षात कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात सुमारे 2700 कोटी रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीच्या नफ्यात सुमारे 12 टक्क्यांची घट झाली होती. मात्र, सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात सुमारे 48 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कंपनीच्या समभागांनी विक्रमी पातळी गाठली

तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आणि कंपनीच्या शेअर्सने विक्रमी पातळी गाठली. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्सने 526.45 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. मात्र, कंपनीचे शेअर्स 511.95 रुपयांवर ओपन झाले. सध्या कंपनीचे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांच्या वाढीसह 497.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 465.45 रुपये प्रति शेअरवर बंद झाले होते.

अल्पावधीत सुमारे 32 हजार कोटी रुपयांचा नफा

विशेष म्हणजे, कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे कंपनीला काही मिनिटांत 32 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 2,43,044.94 कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप 2,74,897.43 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 32 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

देशातील सर्वात मोठा देणगीदार

विप्रो ही देशातील सर्वात मोठ्या परोपकारी व्यक्तींपैकी एक असलेल्या अझीम प्रेमजी यांची कंपनी आहे, जी दरवर्षी सुमारे 1800 कोटी रुपयांची देणगी देते. नोव्हेंबरमधील अहवालानुसार, अझीम प्रेम हे देशातील सर्वात मोठे देणगीदार होते. त्यांच्या पुढे एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर होते. जे दररोज साडेपाच कोटी रुपयांहून अधिक दान देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT