Nitin Gadkari Dainik Gomantak
अर्थविश्व

Nitin Gadkari: कार-बाईकस्वारांसाठी गडकरींची मोठी घोषणा! ऐकून व्हाल थक्क

Nitin Gadkari On Parking Rules: रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari On Parking Rules: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कार-बाईक-ऑटोसह अन्य वाहनांच्या चालकांसाठी अशी घोषणा केली आहे, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, 'जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवला तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.' सरकार लवकरच असा कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोषणा ऐकून सर्वांनाच धक्का बसला

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले होते की, 'रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळेही जामच्या समस्येला सामोरे जावे लागते.' त्यांची ही घोषणा ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. गडकरी पुढे म्हणाले की, 'जर एखाद्या व्यक्तीने आपले वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केले तर त्याला या चुकीसाठी 1000 रुपये दंड आकारला जाईल. हा कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातात घट होईल.'

रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्याला एक हजार दंड

गडकरी पुढे असेही म्हणाले की, 'रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाला एक हजार रुपये दंड होईल, असा कायदा मी आणणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.'

दुसरीकडे, लोक घरे बांधतात पण पार्किंगसाठी जागा ठेवत नाहीत, यावरही गडकरींनी नाराजी व्यक्त केली. लोक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात. त्यांनी पुढे ठणकावून सांगितले की, 'माझ्या नागपुरातील स्वयंपाकीकडे दोन सेकंड हँड वाहने आहेत. आज चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. दिल्लीचे (Delhi) लोक भाग्यवान आहेत. त्यांचे वाहन उभे करण्यासाठी आम्ही रस्ता बनवला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT