FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, तुम्हीही व्हाल खूश!

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने काम करत आहे.

Manish Jadhav

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने काम करत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री किसान फसल विमा योजना या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहेत.

पीएम किसान योजनेत, 10 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

गेल्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन बँकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

प्रादेशिक ग्रामीण बँकांची मदत मागितली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुलभ कर्ज देण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) दीर्घ चर्चा केली होती. यावेळी, त्यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांना तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी मदत करण्यास सांगितले होते.

KCC योजनेचा आढावा घेतला

बैठकीनंतर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले की, या काळात अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा (KCC योजना) आढावा घेतला.

यासोबतच शेतकऱ्यांना (Farmers) संस्थात्मक कर्ज कसे उपलब्ध करुन देता येईल यावर चर्चा केली. अर्थ राज्यमंत्री भागवत के कराड यांनी सांगितले की, या बैठकीत अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मासेमारी आणि दुग्ध व्यवसायात गुंतलेल्यांना केसीसी देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच, प्रादेशिक ग्रामीण बँकांबाबत आणखी एका सत्रात डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी प्रायोजक बँकांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी कर्जामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची भूमिका महत्त्वाची असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT