MotorolaEdge40 Dainik Gomantak
अर्थविश्व

MotorolaEdge40 : तयार रहा! सर्वात स्लिम स्मार्टफोन लवकरच बाजारात; फिचर्स वाचून खरेदीचा मोह आवरणार नाही

New Smart Phone: या फोनचे फोटो Amazon India च्या साईटवर उपलब्ध आहेत. यामध्ये म्युझिक कंट्रोल, गुगल मॅप नेव्हिगेशन, अ‍ॅप नोटिफिकेशन, वेदर विजेट असे पर्याय आहेत.

Ashutosh Masgaunde

New Smart Phone MotorolaEdge40:

लवकरच एक अतिशय खास स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहे. सुप्रसिद्ध ब्रँड Motorola जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन Motorola Razr 40 Ultra भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

कंपनीने अलीकडेच चीनमध्ये Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra लाँच केले आहे. आता ते भारतात येण्यास सज्ज आहेत.

जगातील सर्वात मोठा डिस्पे

अ‍ॅमेझॉन इंडिया ट्विटर हॅंडलवर व्हिडिओच्या माध्यमातून मोटोरोलाचा स्मार्टफोनची झलक दाखवण्यात आली आहे. त्याची अधिकृत वैशिष्ट्ये देखील समोर आली आहेत.

Motorola Razor 40 Ultra मध्ये जगातील सर्वात मोठा डिस्प्ले आहे. हँडसेटची बाहेरची स्क्रीन 3.2 इंच आहे. फोनमधील रिफ्रेश दर 144Hz आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1056×1066 आहे. स्क्रीन गोरिल्ला ग्लास व्हिक्टसद्वारे सुरक्षित असेल.

हँडसेटमध्ये तुम्हाला खूप काय मिळेल?

फोनचे बाह्य पॅनेल (Motorola Razr 40 Ultra) कस्टमाइज शॉर्टकट आणि मल्टीपल अ‍ॅप सपोर्टसह सुसज्ज आहे. याचा फोटो Amazon India च्या साईटवर उपलब्ध आहे.

यामध्ये म्युझिक कंट्रोल, गुगल मॅप नेव्हिगेशन, अ‍ॅप नोटिफिकेशन, वेदर विजेट असे पर्याय असतील. फोनच्या अंतर्गत भागात 6.9-इंचाची LTPO स्क्रीन आहे, जी 165Hz रिफ्रेश रेटसह येते. त्याचा डिस्प्ले 1400 nits पीक ब्राइटनेस आहे. वापरकर्त्यांना HDR + आणि SGS Eye प्रोटेक्शन फीचर देखील मिळणार आहे.

सध्या कंपनीने या सीरीजच्या Razor 40 ला भारतात लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण चीनमध्ये लॉन्च केलेल्या व्हेरिएंटवरून त्याची वैशिष्ट्ये जाणून घेता येतील. स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिप Razor 40 Ultra मध्ये उपलब्ध आहे.

या फोनमध्ये कॅमेऱ्यात 12 मेगापिक्सेल आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन भारतात जवळपास 80,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT