Telecom Sector new rules  Dainik Gomantak
अर्थविश्व

New SIM Card Selling Rules: आता नवीन सिमकार्ड घेणं झालं कठीण, सरकारने बनवले 'हे' नवे नियम

Manish Jadhav

New SIM Card Selling Rules: दूरसंचार विभागाने (DoT) सिमकार्ड विक्रीसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. हे नियम फसव्या फोन कॉल्स तसेच एसएमएस आणि अनेक टेलिकॉम फसवणुकीच्या अहवालानंतर आले आहेत.

खरे तर, एकाच व्यक्तीचे नाव आणि ओळखीचा पुरावा वापरुन हजारोहून अधिक सिमकार्ड जारी केल्याच्या बातम्याही आल्या आहेत.

दरम्यान, फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे सरकारनेही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने 66,000 फसवी व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक केली आहेत.

67,000 सिमकार्ड डीलर्संना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध 300 एफआयआर दाखल केले आणि 52 लाख फोन कनेक्शन निष्क्रिय केले. याशिवाय, फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेली सुमारे 8 लाख बँक वॉलेट अकाऊंट गोठवली आहेत.

सिमकार्डबाबत नवीन नियम

> सिमकार्डच्या (SIM Card) फसव्या विक्रीला आळा घालण्यासाठी नवीन नियमांचा उद्देश आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, हे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील आणि टेलिकॉम ऑपरेटर्संना 30 सप्टेंबरपूर्वी सर्व 'पॉइंट ऑफ सेल' (PoS) नोंदणी करावी लागेल.

> नोंदणी नसलेल्या डीलर्सद्वारे सिमकार्ड विकल्याबद्दल दूरसंचार ऑपरेटर्सवर 10 लाख रुपयांचा दंडही दूरसंचार विभागाने जाहीर केला आहे.

> पुढे असे नमूद केले आहे की, सर्व विद्यमान POS विक्रेत्यांनी सप्टेंबरच्या अखेरीस कागदपत्रे सादर करणे आणि नोंदणी करणे आवश्यक आहे.

> POS किंवा किरकोळ विक्रेत्याने नोंदणीसाठी कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN), किंवा व्यवसाय परवाना, आधार किंवा पासपोर्ट, पॅन, वस्तू आणि सेवा कर नोंदणी प्रमाणपत्र इ. प्रदान करणे आवश्यक आहे.

> PoS कडे CIN, LLPIN, Incorporation प्रमाणपत्र, PAN आणि GST प्रमाणपत्र नसल्यास, त्यांनी शपथपत्र आणि ही कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर लगेच सादर करणे आवश्यक आहे.

> जर एखाद्या पीओएसने बनावट कागदपत्रे सादर केली तर टेलिकॉम ऑपरेटर्संना त्याचा आयडी ब्लॉक करावा लागेल आणि त्या पीओएसद्वारे नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांची पुन्हा पडताळणी करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT