Ration Card New Rule: रेशनकार्डधारकांसाठी 'हा' नवा नियम जारी, करोडो कार्डधारकांचे बल्ले-बल्ले!

Ration Card Update: सरकारने काही अटी आणि नियम बदलले आहेत, ज्याबद्दल सर्व कार्डधारकांना माहिती असणे आवश्यक आहे.
Ration Card Holder
Ration Card HolderDainik Gomantak
Published on
Updated on

Ration Card New Rule: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे रेशनकार्ड असेल आणि तुम्हीही सरकारी रेशनचा लाभ घेत असाल तर आता त्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

सरकारने काही अटी आणि नियम बदलले आहेत, ज्याबद्दल सर्व कार्डधारकांना माहिती असणे आवश्यक आहे. आता नवीन रेशन नियम काय आहेत ते आम्ही तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहोत-

2023 मध्ये मोफत रेशन देखील उपलब्ध आहे

दरम्यान, कोरोना काळात सरकारने (Government) देशातील जनतेसाठी मोफत रेशनची सुविधा सुरु केली होती, त्यानंतरही देशातील करोडो लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत आहे. सरकारने जाहीर केले आहे की, या संपूर्ण वर्षात म्हणजेच 2023 मध्ये तुम्हाला मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळत राहील.

Ration Card Holder
Ration Card Link To Aadhaar: रेशन आणि आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारने..!

बेईमान लोक फायदा घेत आहेत

यावेळी शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक रेशनकार्डधारक पात्र नसून ते मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. त्याचवेळी, योजनेच्या अनेक पात्र कार्डधारकांना त्याचा लाभ मिळत नाही.

चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल

अशा स्थितीत अपात्रांना तात्काळ रेशनकार्ड (Ration Card) जमा करण्यास अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे. अपात्र व्यक्तीने रेशनकार्ड जमा न केल्यास त्याच्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Ration Card Holder
Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांनो सावधान! 'या' चुका कधीही करु नका; अन्यथा तुम्ही...

काय आहे नवीन नियम?

कोणाकडे 100 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त प्लॉट, फ्लॅट किंवा घर, चारचाकी किंवा ट्रॅक्टर, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात तीन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असल्यास अशा लोकांनी त्यांचे रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात जमा करावे.

सरकार वसूल करेल

मिळालेल्या माहितीनुसार, रेशनकार्ड सरेंडर न केल्यास अशा लोकांचे कार्ड तपासणीअंती रद्द केले जातील. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर तो रेशन घेत असल्याने रेशनची वसुलीही होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com