AC Dainik Gomantak
अर्थविश्व

जनतेला बसणार महागाईचा फटका, 1 जुलैपासून AC स्टार रेटिंग लागू होणार

सरकारकडून एअर कंडिशनर म्हणजेच एसी साठी नवीन एनर्जी रेटिंग नियम लागू केले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

New AC Star Rating in India: सरकारकडून एअर कंडिशनर म्हणजेच एसी साठी नवीन एनर्जी रेटिंग नियम लागू केले जात आहेत. हे नियम 1 जुलै 2022 पासून देशभरात लागू होतील. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ने 19 एप्रिल 2022 रोजी नवीन बदलांबाबत अधिसूचना जारी केली होती. हे नवीन स्टार रेटिंग नियम 5 स्टार रेटिंग एसी वर लागू होतील. नवीन नियम लागू झाल्यानंतर तुमच्या एसीचे 5 स्टार रेटिंग 4 स्टारवर कमी होईल. आता या सगळ्यात एक प्रश्न पडतो की असे करण्यामागचे कारण काय?

एसी स्टार रेटिंग म्हणजे काय?

AC चे स्टार रेटिंग ऊर्जा कार्यक्षमता म्हणजेच ऊर्जेचा वापर ठरवते. हे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) द्वारे जारी केले जाते. स्टार रेटिंगच्या मदतीने, तुमचा एसी किती ऊर्जा वाचवेल हे समजणे सोपे होते. आता तुम्ही जितकी जास्त ऊर्जा वाचवाल तितके वीज बिल कमी होईल. आता बीईईमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्टार रेटिंग एका अंकाने कमी करण्यात आले आहे.

एसी स्टार रेटिंगचा ग्राहकांवर काय परिणाम होईल?

नवीन नियम लागू झाल्यानंतर 5 स्टार रेटिंग 4 स्टारवर कमी होईल. विंडो आणि स्प्लिट एसी साठी स्टार रेटिंग सारखे नसेल. नवीन स्टार रेटिंग लागू झाल्यानंतर एसीच्या किमतीत 7 ते 10 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. याचे कारण नवीन नियमांनंतर एसीचा उत्पादन खर्च वाढणार आहे. अशी बातमी देखील समोर आली आहे की, AC नंतर जानेवारी 2023 मध्ये रेफ्रिजरेटरसाठी नवीन स्टार रेटिंग येईल. एसीच्या स्टार रेटिंगमध्ये पुढील बदल आता 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT