Gas Dainik Gomantak
अर्थविश्व

Natural Gas: सणासुदीत सर्वसामान्यांना मोठा झटका, नैसर्गिक वायूच्या दरात विक्रमी वाढ

Natural Gas Price Hiked: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Natural Gas Price Hiked: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. नैसर्गिक वायूच्या किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता महिन्याच्या 1 तारखेला होणाऱ्या एलपीजीच्या आढाव्यात एलपीजीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर आता ग्राहकांना सीएनजी-पीएनजीसाठीही जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढणार!

या वाढीनंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून एलपीजीच्या (LPG) किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या किमतींच्या आढाव्यात नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. वास्तविक, दर सहा महिन्यांनी सरकार दर ठरवते. दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी हा आढावा घेतला जातो. आता नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याने सीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाली

याशिवाय, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती 27 रुपयांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, ऑक्टोबर महिन्यात वितरणासाठी कच्च्या तेलाच्या कराराच्या किमतीत वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हरीचा करार 27 रुपये किंवा 0.4 टक्क्यांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरल झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT