Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: 'या' राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 वा हप्ता! कृषीमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

PM Kisan Samman Nidhi Yojana Update: केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) सुरु केली.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Yojana Update: केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) सुरु केली. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार रुपये पाठवले जातात. सुमारे 10 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून त्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. आता देशभरातील शेतकरी पीएम किसानच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 26 जानेवारीपूर्वी सरकारकडून पुढील हप्ता जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. पण दरम्यान, या योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेराफेरी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली

सध्या छत्तीसगडमधील (Chhattisgarh) शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. वास्तविक, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप भूलेख व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी केलेले नाही. पीएम किसानमधील हेराफेरी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. पुढील हप्ता मिळविण्यासाठी, भूलेख व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी ही दोन्ही कामे आवश्यक आहेत.

8 लाख शेतकऱ्यांची पडताळणी झाली नाही

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, सध्या छत्तीसगडमधील 27,43,708 शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत सक्रिय आहेत. परंतु केवळ 19,75,340 शेतकऱ्यांनाच पीएम किसान (PM Kisan) योजनेचा आगामी हप्ता मिळू शकेल. म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांनी भूलेख व्हेरिफिकेशन आणि केवायसी केलेले नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने आतापर्यंत भूलेख व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी केले नसेल तर त्याला 13 तारखेचा लाभ मिळणे कठीण होईल.

तसेच, या संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास केंद्र सरकारकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 155261 वर कॉल करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT