PM Kisan च्या 13 व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

PM Kisan Latest News: तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomar Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan Latest News: तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारच्या या योजनेशी संबंधित मोठी आणि महत्त्वाची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या वतीने राज्यसभेत देण्यात आली आहे.

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, 'ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या पीएम किसानच्या (PM Kisan) 12 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी झाली आहे. सरकारने या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर केले आहेत.' एका प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली.

Narendra Singh Tomar
PM Kisan: आयकर भरणाऱ्या 'या' शेतकऱ्यांची होणार अडचण, द्यावे लागतील पैसे

प्रत्येकी 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते देण्याची तरतूद

सरकारच्या (Government) या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक आधारावर 6000 रुपये दिले जातात. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा 2-2 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झालेली ही योजना डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, कृषिमंत्र्यांनी वरिष्ठ सभागृहात सांगितले की, एप्रिल-जुलै 2022 दरम्यान, लाभार्थींची संख्या 10.45 कोटींवर पोहोचली आहे. त्यावेळी योजनेचा 11 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

पहिल्या हप्त्याच्या वेळी 3.16 कोटी लाभार्थी

तोमर यांनी पुढे सांगितले की, 'पीएम किसान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याच्या वेळी लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती. त्याचवेळी, 12 व्या हप्त्याच्या वेळी, हा आकडा 8.42 कोटींवर पोहोचला. दुसऱ्या हप्त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 6 कोटी होती. तिसऱ्या कालावधीत ती वाढून 7.66 कोटी झाली. आठव्या हप्त्यात ही संख्या वाढून 9.97 कोटी, नवव्या हप्त्यात 10.34 कोटी आणि 11व्या हप्त्यात 10.45 कोटी झाली.'

Narendra Singh Tomar
PM Kisan Yojana Budget 2023: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसान योजनेची वाढणार रक्कम!

शेतकरी 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

आता देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकार 13 व्या हप्त्याच्या रुपात 2000 रुपये जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करु शकते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली आहे. सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com