Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

मुकेश अंबानींनी अदानींना केले ओव्हरटेक, आशियातील बनले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाचा ताज मिळवला आहे.

दैनिक गोमन्तक

मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाचा ताज मिळवला आहे. गुरुवारी मुकेश अंबानी जगातील अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत सहाव्या क्रमांकावर आले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत मुकेश अंबानींची संपत्ती $3.1 बिलियन झाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या गौतम अदानींची संपत्ती $1.3 बिलियनने कमी झाली होती. याचाच परिणाम असा झाला की, अदानींची सातव्या क्रमांकावर घसरण झाली.

खरं तर, आज मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) कंपनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 3.22 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे, तर अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये आज फारशी वाढ दिसून येत नाहीये. अदानी एंटरप्रायझेस 1.59 टक्के, अदानी पोर्ट 0.55 टक्के, अदानी विल्मर 4.99 टक्के आणि अदानी पॉवर 3.03 टक्क्यांनी घसरुन व्यवहार करत आहेत.

दुसरीकडे, फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत अदानींची एकूण संपत्ती $100.5 अब्ज होती. तर, अंबानींची $101.2 अब्ज. त्याच वेळी, एलन मस्क (Elon Musk) $ 225.5 अब्ज संपत्तीसह प्रथम स्थानावर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट 156.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $147.4 अब्ज आहे. बिल गेट्स 127.7 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT