Reliance to offer $20-bn stake in retail business to Amazon 
अर्थविश्व

‘रिलायन्स’ची अॅमेझॉनला ऑफर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशातील रिटेल व्यवसायाचा  चेहरामोहरा लवकरच बदलण्याची शक्यता असून, रिलायन्स आणि अॅमेझॉन अशी नवी आर्थिक भागीदारी या क्षेत्रामध्ये पाहायला मिळू शकेल. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अॅमेझॉनला रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडमधील  २० अब्ज डॉलरचे (१.४७ लाख कोटी) समभाग खरेदी करण्याची ऑफर देऊ केली आहे. हा करार प्रत्यक्षात आल्यास रिलायन्स तिच्या रिटेल क्षेत्रातील उपकंपनीमधील ४० टक्के एवढा वाटा अॅमेझॉनला देऊ 
करेल.

अॅमेझॉनने रिलायन्सच्या रिटेल व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र हा मुद्दा धोरणात्मक असल्याने त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे सांगत या मुद्द्यावर सविस्तर बोलणे टाळले. 

अंबानींचे वर्चस्व
देशातील रिटेल व्यवसायात आघाडी घेण्याचा मुकेश अंबानी यांचा विचार असून त्यासाठीच त्यांनी अॅमेझॉनसोबत भागीदारी करण्याची तयारी चालविली आहे. अमेरिकेतील वॉलमार्ट देखील रिलायन्ससोबत भागीदारी करण्यास अनुकूल असल्याचे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT