Muhurta trading in Share Market this Shares will give good returns to invertors Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर बाजाराचा आज 'मुहूर्त ट्रेडिंग' हे शेअर्स देतील चांगले रिटर्न्स

दैनिक गोमन्तक

दिवाळीमुळे (Diwali) आज शेअर मार्केट (Share Market) बंद असले तरी दरवर्षीप्रमाणे बाजारात मुहूर्त ट्रेडिंग (Muhurta trading) मात्र होणारच आहे. याच मुहूर्त ट्रेडींगच्या दिवशी बाजार नेमका कसा असणार आहे हे आपण जाणून घेवूया. बाजार तज्ज्ञांच्या मते, बाजारात तेजीचा टप्पा कायम राहू शकतो. संवत 2077 संपल्यानंतरही बाजारा तेजीतच राहणार आहे . गेल्या दिवाळीपासून निफ्टीने गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, त्याचबरोबर स्मॉलकॅप निर्देशांकाने 79 टक्के परतावा दिला आहे आणि मिडकेअर निर्देशांकाने 66 टक्के परतावा दिला आहे.(Muhurta trading in Share Market this Shares will give good returns to invertors)

आज संध्याकाळी बाजारात फक्त एक तास मुहूर्ताचा व्यवहार होणार आहे . या वर्षी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 2021 संध्याकाळी 6.15 पासून सुरू होईल आणि 7.15 पर्यंत चालणार आहे.

गेल्या सहा महिन्यांत, जीएसटी संकलन सातत्याने 1.2 लाख कोटींहून अधिक झाले असून, महसूल संकलनात ही स्थिरता दिसून येत आहे. लॉकडाऊन नंतर सरकार आता वाढत्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करत आहे. देशभरात झपाट्याने वाढत असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे देशातील व्यवसायाला पुन्हा गती मिळाली आहे. यासह भारत आर्थिक विकासाकडे वाटचाल करत आहे.

काही गोष्टी जाणून घेत आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकदारांसाठी काही स्टॉक्स सांगितले आहेत जे बाजारात तेजी आणू शकतात. विविध क्षेत्रांतून हे शेअर्स निवडण्यात आले आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता.

या कंपन्यांचे शेअर्स देतील जबरदस्त रिटर्न

  • KEC आंतरराष्ट्रीय - 27%

  • युनायटेड स्पिरिट्स - 25%

  • कोलते पाटील डेव्हलपर्स - 32 टक्के

  • स्टेट बँक ऑफ इंडिया- 26 टक्के

  • अशोक लेलँड - 30%

  • मिंडा कॉर्पोरेशन - 37 टक्के

  • भारती एअरटेल - 25%

  • ACC Ltd.- 19 टक्के

  • TCS लिमिटेड- 21 टक्के

  • SBI कार्ड्स लिमिटेड - 24%

  • ग्रासिम इंडस्ट्रीज- 21 टक्के

लार्ज कॅप स्टॉक्स-

  • ICICI बँक - 16% परतावा

  • इन्फोसिस - 22% परतावा

  • टाटा मोटर्स - 27% परतावा

  • HDFC बँक - 25% परतावा

  • लार्सन अँड टुब्रो - 21% परतावा

  • टाटा स्टील - 48% परतावा

काही तंज्ञांच्या मते या मुहूर्त ट्रेडिंग नंतर बाजरात चांगले रिटर्न भेटू शकणार आहेत.

काय आहे भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व

भारतीय बाजारासाठी मुहूर्त ट्रेडिंग महत्त्वपूर्ण मानले जाते कारण हा मुहूर्त नवीन वर्षाची किंवा 'संवत'ची सुरुवात करतो. या वर्षी, मुहूर्त ट्रेडिंग हिंदू कॅलेंडरनुसार, संवत 2078 ची सुरुवात करेल.दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवात असल्याने, मुहूर्त ट्रेडिंग सत्र उर्वरित वर्षभर समृद्धी आणि पैसा आणणारा मानला जातो.आणि म्हणून याला भारतीय बाजारात अधिक महत्व आहे. हा हूर्त ट्रेडिंग बाजारात BSE वर 1957 मध्ये आणि NSE वर 1992 मध्ये सराव सुरू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT