More than 15,300 companies and 4,668 limited liability partnerships were registered in August across the India. Dainik Gomantak
अर्थविश्व

दिलासादायक! देशभरात ऑगस्टमध्ये दर दिवशी सुरू झाल्या 493 कंपन्या

Ashutosh Masgaunde

More than 15,300 companies and 4,668 limited liability partnerships were registered in August across the India:

देशभरात ऑगस्टमध्ये 15,300 हून अधिक कंपन्या आणि 4,668 मर्यादित दायित्व भागीदारींच्या नोंदण्या झाल्या आहेत. अशी माहिती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे. त्यामुळे देशात नव्या व्यवसायांच्या समावेशाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसते.

दिवसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये देशात दर दिवशी 493 कंपन्या सुरू झाल्या आहेत.

गेल्या महिन्यात स्थापन झालेल्या कंपन्यांची संख्या गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्थापन झालेल्या 14,400 कंपन्यांपेक्षा सुमारे 6% अधिक आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत 79,300 कंपन्यांची नोंदणी झाली आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी 78,118 कंपन्यांची नोंदणी झाली होती.

या वर्षी जानेवारीमध्ये सुधारित MCA21 पोर्टलमध्ये टू फॅक्टर एथॉंटिकेशनसह नवीन उच्च सुरक्षा फॉर्म आले असूनही, आकडेवारीमध्ये सुधारणा झाली आहे, ज्यामध्ये स्थिर होण्याआधी सुरुवातीला काही समस्या आल्या. आकडे हे देखील सूचित करतात की, सध्या उद्योजकतेची भूक स्थिर आहे.

मंत्रालयाच्या डेटावरून असेही दिसून आले आहे की, देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या आता 1.6 दशलक्षच्या पुढे गेली आहे.

तसेच निष्क्रिय संस्थांना सरकारच्या रजिस्टरमधून काढून टाकल्या गेल्या आहेत. ज्या कंपन्यांनी मागील सलग दोन वर्षे वार्षिक रिटर्न भरले नाहीत त्यांनाही सरकार नियमितपणे बंद करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT