PPF, Sukanya Samriddhi, Mutual Funds and much more... 5 changes in banking rules from October, will direct impact on customers.
PPF, Sukanya Samriddhi, Mutual Funds and much more... 5 changes in banking rules from October, will direct impact on customers.Dainik Gomantak

PPF, सुकन्या समृद्धी, म्युच्युअल फंड आणि बरेच... ऑक्टोंबरपासून बॅंकिंग नियमांत 5 बदल, ग्राहकांवर थेट परिणाम

नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना कार्डच्या टोकनायझेशनपासून नॉमिनी जोडण्यापर्यंत, क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरण्यासाठी लागू केलेल्या शुल्कापर्यंत, ऑक्टोबरमध्ये बरेच बॅंकिंग नियम बदणार आहेत. ज्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Published on

PPF, Sukanya Samriddhi, Mutual Funds and much more... 5 changes in banking rules from October, will direct impact on customers:

तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहारांसाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरत असाल किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल, ऑक्टोबरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पर्सनल बॅंकिंगमध्ये होत आहेत ज्यांचा तुमच्या अर्थ नियोजनावर परिणाम होणार आहे.

म्युच्युअल फंड फोलिओ, डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे. पुढील महिन्यापासून परदेशातील खर्चावरील नवीन TCS नियम लागू होईल. 2,000 रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्याचा हा शेवटचा महिना देखील असू शकतो.

चला तर मग जाणून घेऊया पुढील महिन्यात पर्सनल बॅंकिंग नियमांमध्ये होणारे पाच बदल...

1) म्युच्युअल फंड फोलिओ नॉमिनी

सध्या चालू असलेल्या सर्व म्युच्युअल फंड फोलिओसाठी नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत, 30 ठरवण्यात आली आहे. जे ग्राहक या दिनांकापूर्वी नॉमिनी जोडणार नाहीत त्यांचे फोलिओ गोठवले जातील.

2) नवीन TCS नियम

क्रेडिट कार्डवरील परदेशातील 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 1 ऑक्टोंबरपासून 20 टक्के TCS कर आकारला जाणार आहे. जर असा खर्च वैद्यकीय किंवा शैक्षणिक कारणांसाठी केला जात असेल तर, टीसीएस कर 5 टक्केच आकारला जाईल.

परदेशातील शिक्षणासाठी 7 लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना ०.५ टक्के कमी TCS दर आकारला जाणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये परदेशातील खर्चावरील टीसीएस कर 5 टक्क्यांवरुन 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामधून वैद्यकीय उपचार आणि शिक्षणावरील खर्च वगळण्यात आला आहे.

PPF, Sukanya Samriddhi, Mutual Funds and much more... 5 changes in banking rules from October, will direct impact on customers.
Jai Choudhary: गरीब शेतकऱ्याच्या मुलाचा अमेरिकेत डंका, नोकरी सोडून उभारली 18 लाख कोटींची कंपनी

3) PPF, सुकन्या समृद्धी योजनेसाठी आधार लिंकिंग

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्ट ऑफिस ठेवी आणि इतर लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांनी या महिन्याच्या अखेरीस त्यांचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँकत जाऊन लिंक करणे आवश्यक आहे. ही अट न पाळल्यास त्यांची गुंतवणूक गोठवली जाईल.

PPF, SSY, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) इत्यादी लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य झाला आहे. वित्त मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी या संदर्भात अधिसूचना जारी केली होती.

4) 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी

तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नक्कीच बॅंकेत जमा करा. रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सरकारने अजूनपर्यंत ही मुदत वाढवल्याची कोणतीही माहिती नाही

PPF, Sukanya Samriddhi, Mutual Funds and much more... 5 changes in banking rules from October, will direct impact on customers.
सौदी अरेबियाने भारताला दिला मोठा झटका, तुर्कीनंतर काश्मीर मुद्यावर...

5) डीमॅट, ट्रेडिंग अकाउंटसाठी नॉमिनेशनची अंतिम मुदत

तुम्ही करत असलेल्या सर्व गुंतवणुकीत वारसदार हा महत्त्वाचा घटक आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) देखील, सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना सर्व गुंतवणूकदारांनी वारसदार लावले आहेत की नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुंतवणूकदार एक फॉर्म भरून फंड कंपानीकडे वारदाराचे नाव नोंदवू शकतो. जर गुंतवणूकदारला ही प्रक्रिया ऑनलाइन करायची असेल, तर ती व्यक्ती एकतर ई-साइन वापरू शकते किंवा फंड कंपनीच्या ई-स्वाक्षरीद्वारे वारसदाराचे नाव लावू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com