EPFO Dainik Gomantak
अर्थविश्व

Employee Provident Fund: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO ​​लागू करणार हा नियम

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) बचत योजनेची व्याप्ती (पेन्शन फंड) केंद्र सरकार लवकरच वाढवणार आहे.

दैनिक गोमन्तक

EPF Scheme: तुम्हीही नोकरी करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) बचत योजनेची व्याप्ती (पेन्शन फंड) केंद्र सरकार लवकरच वाढवणार आहे. नव्या निर्णयानंतर कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही पूर्वीपेक्षा जास्त योगदान द्यावे लागणार आहे. सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीत लक्षणीय वाढ होणार आहे. या निर्णयानंतर पूर्वीपेक्षा जास्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कक्षेत येतील.

शेवटचा बदल 2014 मध्ये झाला होता

सध्या, EPFO ​​च्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेसाठी वेतन मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना आहे. त्यात आठ वर्षांपूर्वी 2014 मध्ये बदल करण्यात आला होता. त्यावेळी ती दरमहा 6,500 रुपयांवरुन 15,000 रुपये करण्यात आली होती. अशी कंपनी किंवा कारखाना जिथे 20 पेक्षा जास्त कर्मचारी (Employees) आहेत, त्यांना नियमानुसार पीएफ जमा करावा लागतो.

पगार मर्यादा वाढवण्याबाबत लवकरच निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, पगार मर्यादेत वाढ करण्याबाबत तज्ज्ञ समिती लवकरच निर्णय घेणार आहे. तो महागाईनुसार इंडेक्स केला जाईल असे सांगण्यात येत आहे. EPFO अंतर्गत कव्हरेजसाठी याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. EPFO ​​अंतर्गत किमान वेतन मर्यादा 15000 वरुन 21000 पर्यंत वाढवली जाईल.

दुसरीकडे, पगार मर्यादेत वाढ झाल्याने कर्मचारी आणि नियोक्त्याने जमा केलेल्या पीएफचा हिस्सा वाढेल. आता 15000 रुपयांवर 1800 रुपये आहे, जर तो 21000 पर्यंत वाढवला ​​तर तो 2530 रुपये होईल. यामुळे भविष्यात तयार करण्यात येणारा पेन्शन फंड सध्याच्या निधीपेक्षा जास्त असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT