New age technology and skilled workforce Dainik Goamantak
अर्थविश्व

Skilled Workforce: देशासह जगाची मागणी पूर्ण करण्यावर मोदी सरकारचा भर, कुशल कामगार निर्मितीसाठी आखली मोठी योजना

New Age Skilled Workforce: कुशल कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे देशात नवीन गुंतवणूक आकर्षित होईल. तसेत आखाती देश, जपान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातील कुशल कामगारांची वाढती मागणी पूर्ण करेल.

Ashutosh Masgaunde

New age technology and skilled workforce:

देशातील नव्या तंत्रज्ञान आणि सध्याच्या काळाशी कुशल असलेल्या कामगारांची मागणी पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आपल्या कौशल्य कार्यक्रमांना सरकारच्या राष्ट्रीय प्राधान्य कार्यक्रमांशी एकत्रित करणार आहे, असे याच्याशी संबंधित असलेल्यांनी सांगितले.

याचबरोबर खाजगी क्षेत्राशी जुळवून घेत भारतातील कौशल्य प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय मानकांशी मिळते-जुळते असल्याची खात्री करणे हा सुद्धा यामागचा होतू असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारच्या दीर्घकालीन योजना मेक इन इंडिया, ग्रीन हायड्रोजन, ड्रोन, सेमीकंडक्टर, स्मार्ट मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण आणि अंतराळ यासारख्या उपक्रमांसह सर्वसमावेशक आणि धोरणात्मकदृष्ट्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी जुळलेल्या आहेत," असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त ईकोनॉमिक टाइम्सने दिले आहे.

"याशिवाय, कौशल्य विकास उपक्रम आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करतात का याची खात्री करण्यासाठी सरकार एक मजबूत यंत्रणा तयार करत आहे."

सरकारचा असा विश्वास आहे की, नवीन युगातील तंत्रज्ञानासह प्रशिक्षित आणि कुशल कामगारांची उपलब्धतेतून दोन मोठे हेतू साध्य करणे शक्य आहे. कुशल कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे देशात नवीन गुंतवणूक आकर्षित होईल. तसेत आखाती देश, जपान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातील कुशल कामगारांची वाढती मागणी पूर्ण करेल.

The Confederation of Indian Industry च्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांसारख्या नवीन युगाच्या अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कौशल्य केंद्रे स्थापन करण्याची गरज आहे.

CII च्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आदित्य घोष म्हणाले, "भारतातील तरुणांना उद्योगासाठी विविध कौशल्यांसह सज्ज केल्याने आणि कामगारांचे पुनर्कौशल्य वाढवल्यास देशात कामगारांचा टॅलेंट पूल सहजपणे उपलब्ध होईल, ज्यामुळे कुशल मनुष्यबळ शोधणाऱ्या जागतिक दिग्गज कंपन्यांना आकर्षित करणे सोपो होईल व रोजगाराच्या संधी वाढतील."

तथापि, भारताच्या मोठ्या विस्तारामुळे कौशल्य विकास कार्यक्रमांची व्यापक सुलभता प्रदान करण्यात सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.

"मंत्रालय शहरी आणि दुर्गम भागांमधील दरी कमी करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे, उद्योग आणि इतर भागधारकांच्या सहकार्याने कौशल्य वाढीचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे," असे अधिकाऱ्यांनी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT