Success Story: छंदातून उद्योग विश्व निर्माण करणारी महिला

Ashutosh Masgaunde

कोण आहेत रजनी बेक्टर?

1940 मध्ये कराचीमध्ये जन्मलेल्या रजनी बेक्टरने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला शून्यापासून सुरुवात केली. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले.

Rajni Bector | Dainik Gomantak

कौटुंबिक पार्श्वभूमी

त्यांचे वडील महालेखापाल होते. याच काळात 1947 मध्ये देशाच्या फाळणीच्या वेळी त्या कुटुंबासह दिल्लीत आल्या. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न लुधियानातील धरमवीर बेक्टर यांच्याशी झाले.

Rajni Bector | Dainik Gomantak

छंदातून व्यावसायिक प्रयोग

रजनी यांना सुरुवातीपासूनच स्वयंपाक आणि पार्ट्या करण्याची खूप आवड होती. त्या त्यावेळी लुधियानामध्ये उपलब्ध कुकिंग कोर्सेस घेत असे आणि नंतर कुकीज, सॅलड्स, आईस्क्रीम आणि इतर अनेक गोष्टींवर प्रयोग करत असायच्या.

Rajni Bector | Dainik Gomantak

व्यावसायिक प्रवासाची सुरूवात

लग्नानंतर रजनी यांना तीन मुले झाली, जेव्हा मुले शाळेत जाऊ लागली तेव्हा त्यांना घरी वेळ घालवणे खूप कठीण झाले. यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करत विद्यार्थ्यांना घरीच कुकिंग क्लासेस देण्यास सुरुवात केली.

Rajni Bector | Dainik Gomantak

आणि वेग पकडला

यानंतर पंजाब कृषी विद्यापीठातील अन्न आणि दुग्धव्यवसाय तज्ज्ञ डॉ. एस.सी. जैन यांनी त्यांना हँड चरनर लावण्यात आणि त्यांच्या घरात एक लहान आईस्क्रीमचे दुकान उघडण्यात मदत केली. या सुरुवातीनंतर रजनी बेक्टरने मागे वळून पाहिले नाही.

Rajni Bector | Dainik Gomantak

60 देशांमध्ये निर्यात

सध्या रजनी बेक्टर यांच्या कंपनीची बिस्किटे, ब्रेड आणि आईस्क्रीमची 60 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंग सारख्या फास्ट फूड कंपन्यांनाही त्या ब्रेडचा पुरवठा करतात.

Rajni Bector | Dainik Gomantak

पुरस्कार

2020 मध्ये कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. त्यांच्या या यशासाठी त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.

Rajni Bector | Dainik Gomantak

गोव्यात होणाऱ्या ‘सनबर्न’मध्ये कोरोना प्रसाराची भीती?

अधिक पाहाण्यासाठी...