Yashasvi Jaiswal: 'कमालीचं टॅलेंट...!; फक्त किंग कोहलीकडूनच नाही, तर क्रिकेटविश्वातून जयस्वालवर कौतुकाचा वर्षाव

आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक केल्यानंतर यशस्वी जयस्वालवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalDainik Gomantak

Cricket Fraternity praise Yashasvi Jaiswal: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी झालेल्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 विकेट्स आणि 41 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने विक्रमी अर्धशतकही केले. ज्यामुळे त्याचे सध्या क्रिकेट विश्वातून कौतुक होत आहे.

या सामन्यात कोलकाताने राजस्थानसमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याने 13 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.

त्यामुळे जयस्वालने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही केला. त्याने पहिल्याच षटकात कोलकाताचा कर्णधार नितीश राणाविरुद्ध 26 धावा ठोकल्या होत्या. तसेच त्याने डावाच्या तिसऱ्या षटकात सलग तीन चौकारानंतर अर्धशतक पूर्ण केले. त्याने राजस्थानला वेगवान सुरुवात मिळवून दिली होती, ज्याचा फायदा संघाला 14 षटकांच्या आतच विजय मिळवण्यासाठी झाला.

Yashasvi Jaiswal
IPL 2023: रिंकू सिंह लवकरच टीम इंडियासाठी खेळणार, 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी!

जयस्वालचे कौतुक

दरम्यान, जयस्वालने केलेल्या फलंदाजीचे कौतुक अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी केले आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर जयस्वाने अर्धशतक केल्यानंतरचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की 'वाह, ही मी गेल्या काही काळात पाहिलेली शानदार फलंदाजी आहे. यशस्वी जयस्वाल कमालीचा प्रतिभाशाली आहे.'

तसेच काही खेळाडूंनी जयस्वालला आता भारतीय संघात जागा देण्याची संधी आहे, असेही सुचवले आहे. मायकल वॉ यांनी ट्वीट केले की 'मी जयस्वालला कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी केएल राहुलच्या जागेवर निवडले, तो इतका चांगला आहे. तो सुपरस्टार होईल.'

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली याने लिहिले की 'यशस्वी जयस्वाल वाह! बीसीसीआय त्याला भारतीय संघात घ्या.'

विरेंद्र सेहवागने लिहिले की 'हा मुलगा खास आहे. त्याच्या फटकेबाजीचा आनंद घेतला.'

श्रीलंकेचा माजी कर्णधार लसिथ मलिंगाने लिहिले की 'यशस्वी जयस्वाल माझा आवडता युवा भारतीय फलंदाज आहे. त्याला भारतीय संघात पाहायला उत्सुक आहे.'

याशिवाय देखील अनेक क्रिकेटपटूंनी जयस्वालचे कौतुक केले आहे.

Yashasvi Jaiswal
IPL 2023: धोनीच्या CSK चा सुपर 'विजय', दिल्ली कॅपिटल्स Play Off च्या शर्यतीतून बाद?

राजस्थानचा विजय

या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरच्या 57 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 149 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजी करताना राजस्थानकडून जयस्वाल व्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसनने 29 चेंडून 48 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे राजस्थानने 150 धावांचे आव्हान 13.1 षटकात 1 विकेट गमावत सहज पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com