जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आपल्या नव्याने सादर केलेल्या एमजी विंडसर प्रो इलेक्ट्रिक कारला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, लाँच झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तब्बल ८,००० बुकिंग्स मिळाल्या आहेत.
JSW MG मोटर इंडियाने अलीकडेच भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक SUV MG Windsor Pro (विंडसर प्रो EV) लाँच केली आहे. या कारने लाँच झाल्यानंतर २४ तासांत ८,००० बुकिंग मिळवून बाजारात चांगली सुरुवात केली आहे. कंपनीने विंडसर प्रोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १७.४९ लाख रुपये ठेवली आहे.
जेएसडब्ल्यू एमजी इंडियाचे विक्री प्रमुख राकेश सेन म्हणाले की, प्रचंड प्रतिसाद हा कंपनीच्या ईव्ही तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा पुरावा आहे. ही कार भारतातील वेगाने वाढणाऱ्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात कंपनीच्या मजबूत पावलाचे प्रतीक आहे.
एमजी विंडसर ईव्ही प्रो या नव्या इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये आता ५२.९ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी कंपनीच्या जागतिक मॉडेल्सपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळे तुम्हाला ती पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची चिंता करावी लागणार नाही. या मोठ्या बॅटरीमुळे, एमजी विंडसर ईव्ही प्रो आता एकदा चार्ज केल्यावर ४४९ किलोमीटरपर्यंत धावू शकते.
चार्जिंगसाठी आता तुम्हाला तासंतास वाट पाहावी लागणार नाही. यामध्ये देण्यात आलेल्या 60 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे, ही कार फक्त १ तासात २०% ते ८०% पर्यंत चार्ज होणार.
ही कार १५.६-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ८.८-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि ९-स्पीकर इन्फिनिटी साउंड सिस्टम सारख्या हाय-टेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.