6600mAh बॅटरी, 108MP कॅमेरा आणि पॉवरफूल प्रोसेसरसह Honor X9c 5G लाँच! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honor X9c 5g Launch: Honor X9c 5G स्मार्टफोन अनेक चांगल्या वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसर आहे.
Honor X9c 5g
Honor X9c 5gDainik Gomantak
Published on
Updated on

Honor कंपनीने आपला नवीन Honor X9c 5G स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्टायलिश डिझाइनसह आलेला हा स्मार्टफोन प्रीमियम कॅटेगरीत बजेट फ्रेंडली पर्याय देतो. कंपनीने 21,999 रुपयांमध्ये हा हँडसेट बाजारात सादर केला आहे, जो Amazon Prime Day Sale दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या फोनची खासियत म्हणजे त्याची 6600mAh क्षमतेची बॅटरी, 108MP मुख्य कॅमेरा, आणि 6.78 इंच कर्व्हड AMOLED डिस्प्ले. चला, या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि लाँच ऑफर्सवर एक नजर टाकूया.

Honor X9c 5G चे प्रमुख फीचर्स पाहिले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचे रिझोल्यूशन 2700 x 1224 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.

फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चिपसेट असून, 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट दिला गेला आहे. हा हँडसेट Android 15 वर आधारित MagicOS 9.0 वर चालतो. फोनमध्ये 6600mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून, ती 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Honor X9c 5g
Goa Bars: पर्यटनवृद्धीसाठी गोव्यात शाळा, मंदिरांपासून 100 मीटरमध्ये 210 मद्यालयांना परवाने; सर्वाधिक बार्देश तालुक्‍यात

कॅमेराच्या बाबतीत, Honor X9c 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून त्यात 108MP चा मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह) आणि 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, NFC, आणि USB Type-C पोर्टसारखी कनेक्टिविटी फीचर्स आहेत. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असून, IP65M डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स रेटिंग प्राप्त आहे. हँडसेटचे वजन 189 ग्रॅम इतके आहे.

Honor X9c 5g
Goa Dairy Payment: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांची रक्कम 30 जुलैपर्यंत देणार! 12 कोटींची तरतूद; सहकारमंत्री शिरोडकर

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Honor X9c 5G ची भारतातील किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली असून, हा फोन टायटॅनियम ब्लॅक आणि जेड सायन या दोन रंगांत खरेदीसाठी उपलब्ध असेल.

या मोबाईलची विक्री 12 जुलै 2025 पासून Amazon Prime Day Sale मध्ये सुरू होणार आहे. लाँच ऑफर अंतर्गत, ग्राहकांना 1250 रुपयांपर्यंत सूट आणि 750 रुपयांची बँक ऑफर मिळण्याची संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com