N Chandrasekaran, Chairman of Tata Sons and PM Modi Twitter/@PMOIndia
अर्थविश्व

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एअर इंडिया टाटांच्या ताफ्यात

एअर इंडिया आणि टाटा ग्रुपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

एअर इंडिया (Air India) या विमान कंपनीची कमान पूर्णपणे टाटा समूहाकडे (Tata Group) सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी टाटा समूहाने एअर इंडियामध्ये पहिले पाऊल टाकले आहे. टाटा ग्रुपने आपल्या ट्विटर हँडलवर एअर इंडियाचे स्वागत केले. 'तुमच्यासोबत टेक ऑफ करण्यास उत्सुक आहे!' असा संदेश आपल्या ट्विटमध्ये टाटा ग्रुपने दिला आहे. यासोबतच एअर इंडियाची एक सुंदर पोस्टही रिट्विट करण्यात आली आहे. (Air India Latest News Udpates)

टाटा समूहात सहभागी होतांना एअर इंडियानेही एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. "टाटा समूहाचा भाग म्हणून एअर इंडियासाठी आता एक नवीन अध्याय सुरू होत आहे. आता या सर्वात उत्तम प्रवासात पुढे जाण्यासाठी दोन प्रतिष्ठित नावे एकत्र आली आहेत. आमच्या देशाची आणि आमच्या मौल्यवान वारशाची सेवा करण्याच्या मिशनवर एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहे. टाटा कंपनीमध्ये आपले स्वागत आहे!"

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या संदेशात लिहिले की, 'एअर इंडिया टाटा समूहात परत आल्याने आम्ही उत्साहित आहोत. आम्ही त्याला जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. मी आमच्या ग्रुपमध्ये एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करतो.'

अर्थमंत्र्यांसोबत बैठक

यासोबतच चंद्रशेखरन यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. एअर इंडियाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी अर्थमंत्र्यांचेही अभिनंदन केले. याआधी चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यानंतर एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. चंद्रशेखरनचे एअर इंडियाच्या कार्यालयात जाणारे फोटोही कंपनीच्या हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT