Mental Health Dainik Gomantak
अर्थविश्व

Mental Health Insurance : चिंता नसावी! आता मानसिक आजारांसाठी देखील मिळणार विमा संरक्षण

बदलेली जीवनशैली आणि कामाच्या वाढत्या दबावामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

Pramod Yadav

Insurance For Mental Health: बदलेली जीवनशैली आणि कामाच्या वाढत्या दबावामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. लोक नैराश्य, तणाव यांसारख्या समस्यांचा सामना करत आहेत.

एका अग्रगण्य मानसिक आरोग्य संस्थेच्या मते, गेल्या तीन महिन्यांत नैराश्य आणि चिंतेसाठी समुपदेशन घेणाऱ्यांच्या संख्येत 40 टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, विमा नियामकाने जानेवारी 2023 मध्ये विमा कंपन्यांना प्रत्येक पॉलिसीधारकाला मानसिक आजारांसाठी संरक्षण प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत.

सायरस आणि प्रिया वांद्रेवाला फाऊंडेशन मोफत मानसिक आरोग्य समुपदेशन सेवा पुरवतात. फाऊंडेशनच्या मते, गेल्या 18 महिन्यांत, म्हणजे ऑगस्ट 2021 ते जानेवारी 2023 या कालावधीत समुपदेशनाची मागणी केलेल्यापैकी एक तृतीयांश लोकांना चिंता, नैराश्य, आत्महत्येचे विचार आणि औदासिन्य अशा समस्या जानवत होत्या.

तर गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात या समस्यांची संख्या जवळपास 40 टक्क्यांवर पोहोचली आहे. संपर्क साधलेल्या एक तृतीयांश लोकांनी सांगितले की ते मानसिक आजार, चिंता, नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांशी लढत आहेत. अशी माहिती फाऊंडेशनच्या प्रमुख प्रिया हिरानंदानी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

दरम्यान, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जानेवारी 2023 पासून पॉलिसीमध्ये मानसिक आरोग्याचा समावेश अनिवार्य केला आहे. त्यामुळे आरोग्य पॉलिसी घेताना मानसिक आरोग्य कव्हरेजकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना (Ayushman Bharat PMJAY) अंतर्गत केंद्र सरकार लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी विमा संरक्षण देते. मानसिक आरोग्याशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांना आयुष्मान योजनेद्वारे वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे आयुष्मान कार्ड बनवणे खूप फायदेशीर ठरू शकते.

उत्तम मानसिक आरोग्यासाठी काही टीप्स

मानसिक आरोग्य समस्या व्यवस्थापन करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा केली पाहिजे.

गॅजेट्सचा अतिवापर टाळणे महत्त्वाचे आहे. किशोरवयीन आणि तरुणांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे.

तणावाचा सामना करण्यासाठी थेरपिस्ट किंवा समुपदेशकासोबत सल्लामसलत करणे महत्वाचे आहे.

सोशल मीडिया, तंत्रज्ञान, ड्रग्ज आणि अल्कोहोल मानसिक आरोग्याच्या समस्या गंभीर करणारे घटक आहेत. हा गोष्टी टाळणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT