Maruti eVitara Dainik Gomantak
अर्थविश्व

Maruti Electric Car: मारुती सुझुकी लवकरच करणार मोठा धमाका! Maruti eVitara च्या लॉन्चिंगसह कारप्रेमींना देणार शानदार 'ऑफर'

Maruti Electric Car 500 km Range: मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार मारुती ईविटारा प्रदर्शित केली. एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त रेंज देणाऱ्या या कारच्या लाँचिंगची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Manish Jadhav

मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार मारुती ईविटारा (Maruti eVitara) प्रदर्शित केली. एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त रेंज देणाऱ्या या कारच्या लाँचिंगची सर्वांनाच उत्सुकता आहे. याचदरम्यान आता समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच चकीत केले आहे. या कारच्या लाँचिंगसह कंपनी ग्राहकांना एक खास ऑफर देणार असल्याचे सांगितले जात आहे.

तुम्हाला 10 वर्षांपर्यंतची वॉरंटी मिळणार

दरम्यान, सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या बहुतेक इलेक्ट्रिक कार 8 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. मात्र इतर कंपन्यांना मागे टाकत मारुती सुझुकीने 10 वर्षांपर्यंतच्या वॉरंटीसह त्यांची पहिली जागतिक इलेक्ट्रिक कार मारुती ईविटारा लॉन्च करण्याची योजना आखली आहे. मारुती सुझुकीने आपल्या कारसोबत 10 वर्षांची वॉरंटी देण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे ईविटारामध्ये BYD च्या ब्लेड बॅटरीचा वापर असल्याचे सांगितले जात आहे.

गाडीवाडीच्या अहवालानुसार, मारुती सुझुकीची मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन युरोपियन कार मार्केटमध्ये त्यांच्या कारवर 3 वर्षे किंवा 1 लाख किमी आणि 6 वर्षे किंवा 1.5 लाख किमीची वॉरंटी देते. सुझुकी ईविटारासोबत काहीतरी हटके करु इच्छिते. कंपनी ओनरशिप कॉस्ट कमी करण्यासाठी 10 वर्षांपर्यंत किंवा सुमारे 2 लाख किमीची वॉरंटी देऊ शकते.

युरोपियन बाजारपेठेसाठी घोषणा केली

मारुती सुझुकीची मूळ कंपनी असलेल्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने अलीकडेच युरोपियन मार्केटसाठी ईविटारासंबंधी काही अपडेट दिली. या अपडेटसोबत अशी माहिती देखील समोर आली की, कंपनी युरोपियन मार्केटला आकर्षित करण्यासाठी ईविटारासोबत शानदार ऑफर देऊ शकते. कंपनी सुरुवातीला ही कार ब्रिटन आणि नेदरलँड्ससारख्या मोठ्या युरोपीय मार्केटमध्ये लॉन्च करु शकते.

तथापि, ही ऑफर भारतीय मार्केटसाठी देखील उपलब्ध असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बरं, भारत (India) हा मारुती सुझुकीसाठी सर्वात मोठ्या मार्केटपैकी एक असून उत्पादन केंद्रही आहे. अशा परिस्थितीत, इथेही तुम्हाला मारुती ईविटाराच्या लॉन्चिंगसह शानदार ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे.

ब्लिकच्या अहवालानुसार, मारुती सुझुकी ईविटाराचे उत्पादन मे महिन्यात सुरु होऊ शकते. याच सुमारास ती भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी तिच्या गुजरात प्लांटमध्ये 100 हून अधिक जागतिक बाजारपेठांसाठी मारुती ईविटारा तयार करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT