Malaysia Trip Dainik Gomantak
अर्थविश्व

Malaysia: फिरायला मलेशियाला जाताय? विमानाच्या तिकीटांवर 15 टक्के सवलत, अट फक्त एकच

Malaysia Airlines: मलेशिया एअरलाइन्स प्रवाशांना काही अर्ली बर्ड एक्सक्लुझिव्ह ऑफर्स देत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Malaysia Airlines

मलेशिया फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. मलेशिया एअरलाइन्सने ICICI बँकेसोबत नुकतीच एक विशेष भागीदारी जाहीर केलीय. यात आयसीआयसीआय कार्डधारकांना ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म आणि ॲपद्वारे एअरलाइनशी थेट फ्लाइट बुकिंगवर 15 टक्के सूट देण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मलेशियाला जाणाऱ्यांसाठी ही सूट फायदेशीर ठरणार आहे.

ICICI बँकेचे ग्राहक मलेशिया एअरलाइन्सच्या वेबसाइटवर क्रेडिट किंवा डेबिट कार्डने बुकिंग करुन विशेष ऑफरचा आनंद घेऊ शकतात. MHICICI24 या प्रोमो कोडचा वापर करुन 15 मे 2025 पर्यंत ग्राहकांना बुकिंग करता येणाराय. हे बुकिंग 30 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रवासासाठी वैध राहणार आहे.

विशेष बाब म्हणजे, जगप्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोबत मलेशिया एअरलाइन्सची विशेष भागीदारी असल्याने सर्व मँचेस्टर युनायटेड ICICI कार्डधारक इकॉनॉमी क्लासच्या भाड्यावर अतिरिक्त सवलतीचा आनंद घेऊ शकणार आहेत.

ICICIMU24 या प्रोमो कोडचा वापर करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत बुकिंग करता येणार आहे.

एवढेच नव्हे तर, मलेशिया एअरलाइन्स प्रवाशांना काही अर्ली बर्ड एक्सक्लुझिव्ह ऑफर्स देत आहे. यात परतीच्या फ्लाइट्स फक्त INR 18,999 (सर्व समावेशासह) पासून सुरू होणारेत. तुम्ही जर क्वालालंपूर, ट्विन टॉवर्स, सिडनी सिंगापूरला भेट देण्याचा विचार करत असाल तर या ऑफरचा लाभ घेता येईल. 24 डिसेंबर 2024 पर्यंत यासाठी बुकिंग करता येईल, या बुकिंगवर 1 फेब्रुवारी ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रवास करता येईल.

मलेशिया एअरलाइन्सच्या या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी व तिकिट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा मलेशिया एअरलाइन्स ॲप डाउनलोड करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT