Rewa Margao Special Train: मध्य प्रदेशातून मुंबई मार्गे गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; कधी सुरु होणार Booking? जाणून घ्या Time Table

Rewa - Margao - Rewa Special Train: रीवा-मडगाव-रीवा ट्रेन रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबेल.
Rewa Margao Special Train: मध्य प्रदेशातून मुंबई मार्गे गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; कधी सुरु होणार Booking? जाणून घ्या Time Table
Rewa Margao Special TrainDainik Gomantak
Published on
Updated on

Rewa - Margao - Rewa Special Train Time Table, Booking, Schedule

पश्चिम मध्य रेल्वेने (PMR) मध्य प्रदेशातील रीवा ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, जबलपूरहून तीन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. रीवा-मडगाव-रीवा दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येकी दोन फेऱ्या करेल, अशी माहिती भोपाळ रेल्वे विभागाच्या प्रवक्त्यानी दिलीय.

रीवा-मडगाव विशेष ट्रेन (Rewa - Margao - Rewa Special Train)

रीवा-मडगाव ट्रेन क्रमांक 01703

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01703 रीवा-मडगाव विशेष ट्रेन 22 डिसेंबर आणि 29 डिसेंबर (रविवार) रोजी दुपारी 12:00 वाजता रीवा येथून सुटेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री 09:25 वाजता मडगाव स्थानकात पोहोचेल.

मडगाव-रीवा ट्रेन क्रमांक 01704

तसेच ट्रेन क्रमांक 01704 मडगाव-रीवा विशेष गाडी मडगावहून 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबर (सोमवार) रोजी रात्री 10:25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरदा, इटारसी येथून तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी 8:20 वाजता रीवा स्थानकावर पोहोचेल.

Rewa Margao Special Train: मध्य प्रदेशातून मुंबई मार्गे गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; कधी सुरु होणार Booking? जाणून घ्या Time Table
Amit Naik: "मला बळीचा बकरा केला आहे" म्हणणाऱ्या अमित नाईकला कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

या स्थानकांवर थांबेल ट्रेन (Halts / Stops)

ट्रेन सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबेल.

डबे (Coach)

या ट्रेनला एकूण 24 डबे असतील, ज्यामध्ये १ वातानुकूलित प्रथम श्रेणी (फर्स्ट एसी), 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी (सेकंड एसी), 5 वातानुकूलित तृतीय श्रेणी (थर्ड एसी), 11 स्लीपर कोच (स्लीपर), 4 सामान्य वर्ग आणि 2 SLRD यांचा समावेश आहे.

Rewa Margao Special Train: मध्य प्रदेशातून मुंबई मार्गे गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; कधी सुरु होणार Booking? जाणून घ्या Time Table
Bhumika Temple Goa: साखळेश्वर देवस्थानाचा वाद शमला; भक्तांसाठी मंदिराचा तर वाहतुकीसाठी पर्ये-साखळीचा मार्ग मोकळा

जबलपूर ते कोईम्बतूर स्पेशल ट्रेन (Jabalpur To Coimbatore Special Train)

ही ट्रेन 3 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी जबलपूरहून सुटेल आणि रविवारी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी कोईम्बतूरला पोहोचेल.

तसेच कोईम्बतूर-जबलपूर (Train No 02197) ही ट्रेन 6 जानेवारीपासून दर सोमवारी रात्री 07.05 वाजता कोईम्बतूरहून सुटेल आणि बुधवारी सकाळी 8.45 वाजता जबलपूरला पोहोचेल.

ही ट्रेन जबलपूर, नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, रत्नागिरी, मडगाव, मंगळुरु आणि कोईम्बतूर या स्थानकांवर थांबेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com