Mahindra Recalled More Than One Lakh Units Of XUV700 and XUV400 Cars:
महिंद्रा आणि महिंद्राला त्यांच्या XUV700 आणि XUV400 कार्सच्या इंजिन बे वायरिंग लूममध्ये त्रुटी आढळली आहे. त्यामुळे कंपनीले दोन्ही कार्सच्या एकूण 1.1 लाख युनिट्सची तपासणी करण्यासाठी त्या माघारी मागवल्या आहेत.
ज्या कार्समध्ये त्रुटी अढळतील त्या कंपनी मोफत दुरुस्त करेल. जे मोफत असेल. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, 8 जून 2021 ते 28 जून 2023 दरम्यान उत्पादित केलेल्या महिंद्रा XUV700 च्या 1,08,306 युनिट्सना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय, 16 फेब्रुवारी 2023 ते 5 जून 2023 दरम्यान उत्पादित इलेक्ट्रिक XUV400 चे 3,560 युनिट्स देखील कंपनीने परत मागवले आहेत.
कंपनी या वाहनांमधील ब्रेक पोटेंटिओमीटरमध्ये आढळलेल्या काही दोषांची तपासणी करेल आणि दोष असल्यास ते दुरुस्त करेल. यासाठी कंपनीच्या वतीने वाहनांच्या मालकांशी वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये, महिन्द्रा आणि महिन्द्राने 1 जुलै ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित 12,566 XUV700 युनिट्स परत मागवल्या होत्या. त्यावेळी रबर बेलो क्लिअरन्सवर परिणाम करणाऱ्या त्रुटीमुळे कंपनीने Scorpio-N च्या 6,618 युनिट्स परत मागवल्या होत्या.
मारुती सुझुकी 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान उत्पादित केलेल्या S-Presso आणि Eeco मॉडेल्सच्या 87,599 युनिट्स परत मागवत आहे. सदोष स्टीयरिंग टाय रॉड बदलण्यासाठी कंपनीने हा निर्यण घेतला आहे.
महिंद्राने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आपल्या पुढील काळात लॉन्च होणाऱ्या वाहनांचे अनावरण केले, ज्यामध्ये Thar.E, महिंद्रा स्कॉर्पिओ आधारित पिकअप ट्रकसह, कंपनीने ट्रॅक्टरची नवीन श्रेणी देखील सादर केली होती.
याशिवाय कंपनीने नवीन लोगोचेही अनावरण केले होते. जो कंपनी आपल्या आगामी नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही (इलेक्ट्रिक) मध्ये वापरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.