State Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Loans For Corona's Illness! कोरोना उपचारासाठी SBI देत आहे कर्ज

कर्ज घेण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह अहवाल हा 30 दिवसांपेक्षा जुना नसावा

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देश चिंताग्रस्त आहे आणि त्याचे कारण आहे देशात सध्या कोरोना रूग्णांची मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ. पण, आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत की, ज्यामुळे तुमची चिंता काही प्रमाणात कमी होईल. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य विमा काढणे खूप महत्वाचे झाले आहे, परंतु तुम्ही जर आरोग्य विमा काढला नसेल आणि तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल, तर उपचाराचा खर्च हा मोठ्या प्रमाणात होतो. पण, तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर ही समस्या मात्र कमी होऊ शकते.

एसबीआय कवच पर्सनल लोन

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)ग्राहकांना वैयक्तिक कवच कर्ज देत आहे. आणि त्याचा उद्देश हा कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांना उपचार देणे हा आहे. SBI च्या वेबसाइटवर प्रसिध्द झालेल्या माहितीनुसार, एसबीआय कवच पर्सनल लोन बॅंकेच्या त्या ग्राहकांसाठी आहे जे पगारदार व पेन्शन धारक आहेत. या कर्जाचे पैसे हे थेट ग्राहकाच्या पगार,पेन्शन,चालू व बचत खात्यात जमा केले जातात आणि ग्राहक आवश्यकतेनुसार त्याच्या उपचारावर खर्च करू शकतात.

किती द्यावे लागणार व्याज?

SBI च्या वेबसाइटवर प्रसिध्द झालेल्या माहितीनुसार, एसबीआय कवच पर्सनल लोन साठी ग्राहकाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. प्रोसेसिंग फीस, सिक्यूरिटी, री-पेमेंट पेनॅाल्टी(Penalty) आणि फोरक्लोज़र फीस शून्य आहे. त्याचबरोबर हे कर्ज (loan)8.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. आणि त्याचा कालावधी 60 हा महिन्यांपर्यंत असू शकतो. SBI ग्राहकांच्या पात्रतेनुसार या अंतर्गत कमीत कमी 25,000 रुपये ते जास्तीत जास्त 5 लाख रुपये कर्ज देते.

कसे घ्यावे एसबीआय कवच पर्सनल लोन?

तुम्ही पात्र असल्यास, तुम्ही SBI इंटरनेट बँकिंग, SBI Yono अॅप तसेच जवळच्या SBI शाखेद्वारे एसबीआय कवच हे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. परंतु, एसबीआय कवच वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह अहवाल हा 30 दिवसांपेक्षा जुना नसावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT