अर्थविश्व

नव्वदच्या दशकातील LML स्कूटर पुन्हा धावणार, Yamaha RX100,Lambretta पुनरागमनासाठी सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

भारतातील दुचाकी बाजारपेठेतील अनेक लोकप्रिय कंपन्या पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध एलएमएल (Lohia Machinery Limited) स्कूटर देखील पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. 1990 च्या दशकात बजाज आणि इतर ऑटोमोबाईल कंपन्यांना आपल्या चमकदार स्कूटर्सने टक्कर देणार्‍या एलएमएलने काही वर्षांपूर्वी दुचाकींचे उत्पादन बंद केले. थांडावलेली विक्री आणि तोटा यामुळे कंपनीने भारतातील आपले कामकाज बंद केले.

लोहिया मशीन्स लिमिटेड (LML) ने 1980 च्या दशकात इटलीच्या पियाजिओसोबत भागीदारी केली. या भागीदारीअंतर्गत, कंपनीने भारतीय बाजारात लोकप्रिय स्कूटर LML Vespa लाँच केली होती. 1999 च्या सुमारास, Piaggio बरोबर भागिदारी संपृष्टात आल्यानंतर कंपनी दिवाळखोरीत निघाली. कंपनीच्या पुनरुज्जीवन योजना अयशस्वी झाल्या अखेर, 2018 मध्ये कंपनीने व्यवसाय बंद केला.

LML आता पुन्हा एकदा नव्या अवतारात रस्त्यावर उतरणार आहे. एसजी कॉर्पोरेट मोबिलिटी या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने LML हा ब्रँड विकत घेतला आहे. एसजी कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केलाय. SG कॉर्पोरेट मोबिलिटी आता LML स्कूटर इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे लवकरच एलएमएल स्कूटर रस्त्यावर धावताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT