Aadhar Card  Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhar Update: आधार क्रमांकाशी ई-मेल आयडी लिंक करा आणि गैरवापर टाळा

आधार धारकाने आधारच्या सुरक्षिततेबाबत नेहमी सतर्क असले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आधारच्या गैरवापराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. आता UIDAI ने ई-मेल आयडीला आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे फायदे स्पष्ट केले आहेत.

दैनिक गोमन्तक

आधार कार्ड (AADHAAR) हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्डचा ट्रेंड वाढल्याने त्याचा गैरवापर होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आधारचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार केवळ आर्थिक फसवणूक करत नाहीत, तर काही गुन्हेगारी कारवायांमध्येही त्याचा वापर करत आहेत. आता तुमचा आधार जिथे वापरला जाईल त्याच वेळी तुम्हाला माहिती मिळू शकेल. यासाठी तुम्हाला थोडेसे काम करावे लागेल.

(Link e-mail ID with Aadhaar number and avoid misuse)

आधार धारकांनी त्यांचा ई-मेल आयडी आधारशी लिंक केल्यास त्यांना मोठा फायदा होईल, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे म्हणणे आहे. आधार क्रमांक कोठेही वापरण्यासाठी प्रमाणीकृत केल्यावर, वापरकर्त्याला त्याच वेळी त्याची माहिती मिळेल. जिथे जिथे आधार वापरला जातो तिथे ते प्रमाणीकृत केले जाते. एकदा का ई-मेल आयडी आधारशी लिंक झाला की, त्याच वेळी ई-मेलवर एक संदेश येईल.

लिंक कशी करायची?

UIDAI ने ट्विट केले आहे की आधार कार्डमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी आणि लिंक करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आजकाल जवळपास प्रत्येक शहरात आधार केंद्रे आहेत. तेथे नवीन आधार तयार करणे आणि अपडेट करणे यासह सर्व काम केले जाते. तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राची माहिती https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ वर मिळेल.

आधार 10 वर्षांचा आहे तर ते अपडेट करा

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता अशा लोकांना त्यांच्या आधार कार्डचे सर्व तपशील अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यांचा युनिक आयडी 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता आणि त्यांनी या कालावधीत तो कधीही अपडेट केलेला नाही. UIDAI ने आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्रे अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो. तसे करणे बंधनकारक नसल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे. पण, ते आधारधारकांच्या हिताचे आहे. UIDAI म्हणते की आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, मायआधार पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर आधारधारक आधार केंद्रावर जाऊनही हे काम करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT