How To Earn Money From Instagram: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram हळूहळू फोटो शेअरिंग पर्यायांपेक्षा लहान व्हिडिओंवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या 2 वर्षात कंपनीने यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. आणि त्यात अनेक नवीन फीचर्स देखील जोडले गेले आहेत. Tiktok शी स्पर्धा करण्यासाठी कंपनी अधिकाधिक युजर्संना लहान व्हिडिओंकडे आणू इच्छिते. यासाठी ते त्यांना कमाईची ऑफरही देत आहेत. आता कमाई दरम्यान, कंपनीने दिवाळीच्या खास प्रसंगी अतिरिक्त कमाई करण्याची ऑफर आणली आहे. कंपनीच्या या ऑफरबद्दल आणि त्याद्वारे तुम्ही अतिरिक्त पैसे कसे कमवू शकता, चल तर मग जाणून घेऊया...
ही कंपनीची नवीन ऑफर आहे
Meta ने भारतात या प्लॅटफॉर्मसाठी Reels Play बोनस ऑफर देखील लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत व्हिडिओ बनवणाऱ्या युजर्सना $5000 पर्यंत ( Around Rs.4 Lakhs) बोनस मिळेल. आतापर्यंत ही ऑफर फक्त यूएसमध्येच (USA) चालत होती, पण आता ती इंडियन कन्टेट क्रिएटर्ससाठीही जारी करण्यात आली आहे. या शानदार ऑफरमुळे, इंडियन कन्टेट क्रिएटर्स आता ब्रॅंड स्पॉन्सरशिप आणि एफिलिएट कार्यक्रमांव्यतिरिक्त थेट मेटामधून पैसे कमविण्याची संधी मिळेल. ही ऑफर सादर केल्यानंतर, Instagram आता वापरकर्त्यांना अधिकाधिक रील बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कंपनीला लहान व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या बाबतीत टिकटॉकला (TikTok) मागे सोडायचे आहे.
या ऑफर अंतर्गत
या ऑफर अंतर्गत रील बनवल्यानंतर बोनस नंबर ऑफ प्ले वर अवलंबून असेल. यामध्ये प्ले 165M पर्यंत मोजले जाईल. बोनससाठी 150 पर्यंत रील आवश्यक आहेत. एकदा सुरु केल्यानंतर, वापरकर्त्याकडे कमाल बोनससाठी 1 महिन्यापर्यंतचा कालावधी असेल. 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी बोनस सक्रिय केला जाऊ शकतो. एलिजिबल क्रिएटर्स रील्समधून पैसे कमवू शकतात, जेव्हा त्यांच्या रीलला गेल्या 30 दिवसांत 1000 व्ह्यूज मिळाले आहेत. एकूणच, रील क्रिएटर्संना आत्ता लाखो बोनस मिळवण्याची उत्तम संधी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.