LIC Dainik Gomantak
अर्थविश्व

आधी RBI, आता निवडणुकीनंतर LIC सरकारला करणार मालामाल! जाणून घ्या का देणार 3662 कोटी?

LIC Dividend: देशातील आघाडीची विमा कंपनी LIC ने नुकतेच आपले तिमाही निकाल सादर केले आहेत.

Manish Jadhav

LIC Dividend: देशातील आघाडीची विमा कंपनी LIC ने नुकतेच आपले तिमाही निकाल सादर केले आहेत. चौथ्या तिमाहीत विमा कंपनीचा निव्वळ नफा 2 टक्क्यांनी वाढून 13,763 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या याच तिमाहीत कंपनीने 13,428 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. निव्वळ नफ्यात वाढ झाल्यामुळे कंपनीने प्रति शेअर 6 रुपये लाभांशही जाहीर केला आहे. एलआयसीमध्ये सरकारची (Government) सुमारे 96.5 टक्के भागीदारी आहे, ज्यामुळे आता कंपनी सरकारला 3662 कोटी रुपयांचा लांभाश (Dividend) देणार आहे. एलआयसीपूर्वी रिझर्व्ह बँकेनेही सरकारला 2.11 लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली होती.

एकूण उत्पन्न 2,50,923 कोटी रुपयांवर पोहोचले

एलआयसीने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, चौथ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 2,50,923 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या याच तिमाहीत ते 2,00,185 कोटी रुपये होते. एलआयसीचा वार्षिक प्रीमियमही जानेवारी-मार्च तिमाहीत 10.7 टक्क्यांनी वाढून 21,180 कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 19,137 कोटी रुपये होता. तथापि, एलआयसीच्या नवीन व्यवसायात 1.6 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 3,704 कोटी रुपयांच्या तुलनेत ते आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत केवळ 3,645 कोटी रुपये होते.

पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्येही वाढ झाली

जानेवारी-मार्च तिमाहीत एलआयसीच्या पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्येही वाढ झाली आहे. हा आकडा 13,810 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या याच तिमाहीत पहिल्या वर्षाचा प्रीमियम फक्त 12,811 कोटी रुपये होता. रिन्यूअल प्रीमियम देखील या कालावधीत 77,368 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो आर्थिक वर्ष 2023 च्या याच कालावधीत 76,009 कोटी रुपये होता.

बाजारातील हिस्सा 58.87 टक्के आहे

दरम्यान, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात LIC चा निव्वळ नफा 40,676 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात तो 36,397 कोटी रुपये होता. कंपनीला 2024 या आर्थिक वर्षात प्रीमियममधून 4,75,070 कोटी रुपये मिळाले आहेत. वित्तीय वर्ष 2024 च्या अखेरीस LIC चा बाजार हिस्सा 58.87 टक्के होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT