LIC Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC ची 'धन वृद्धी' योजना फक्त तुमच्यासाठी, 30 सप्टेंबरपर्यंत करु शकता अर्ज; मिळतील 'हे' फायदे

LIC द्वारा वेळोवेळी ग्राहकांसाठी अनेक नवीन योजना आणल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Manish Jadhav

LIC द्वारा वेळोवेळी ग्राहकांसाठी अनेक नवीन योजना आणल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तसेच भविष्याची हमीही मिळते. आज LIC ने ग्राहकांसाठी आणखी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत तुम्ही फक्त 23 जून 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करु शकता. चला तर मग जाणून घेऊया या पॉलिसीचे नाव आणि त्याची खासियत काय आहे-

23 जूनपासून लाभ घेता येईल

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC ने शुक्रवारी 'धन वृद्धी' ही नवीन निश्चित मुदत विमा योजना सादर केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, या विमा योजनेची सुरुवात 23 जूनपासून झाली आहे.

एलआयसीच्या मते, धन वृद्धी ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड, वैयक्तिक, बचत आणि सिंगल प्रीमियम लाइफ प्लॅन आहे जी संरक्षण आणि बचत यांचे संयोजन देते.

मृत्यूनंतर कुटुंबाला पूर्ण पैसे मिळतील

पॉलिसी सुरु असताना धारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुदतपूर्तीचा कालावधी पूर्ण झाल्यावर हमीभाव देण्याची तरतूदही त्यात ठेवण्यात आली आहे.

किती वर्षांसाठी पॉलिसी घेऊ शकतो?

ही योजना 10, 15 आणि 18 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. हे 1.25 लाख रुपयांची किमान मूलभूत निश्चित रक्कम देते जी 5,000 रुपयांच्या पटीत देखील वाढवता येते.

कर सवलतीचा लाभ मिळेल

या प्‍लॅनमध्‍ये प्रवेश करण्‍याचे कमाल वय 32 ते 60 वर्षे कालावधी आणि पर्यायानुसार आहे. या योजनेचे गुंतवणूकदार (Investors) ते कधीही सरेंडर करु शकतात आणि 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट देखील मिळवू शकता.

सिंगल प्रीमियम पॉलिसी

तसेच, ही पॉलिसी जीवन विमा सिंगल-प्रिमियम पॉलिसी आहे. ही पॉलिसी मुदतीदरम्यान बचत आणि संरक्षण यांचे संयोजन देते. लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, ही पॉलिसी 1,000 रुपयांच्या विमा रकमेवर 75 रुपयांपर्यंत अतिरिक्त हमी देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT