Car lona Dainik Gomantak
अर्थविश्व

लोनवर कार घेत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात

लोनवर कार घेतांना काही गोष्टी लक्षात ठेवल्यात आपले नुकसान होणार नाही.

दैनिक गोमन्तक

भारतामध्ये कार खरेदी करणे हा अजूनही मोठा निर्णय मानला जातो. आपल्या देशात कार खरेदी करणे हे देखील स्टेटस सिम्बॉल मानले जाते. कार (Car)खरेदी करण्यासाठी बँका (Bank) आणि वित्तीय संस्था मदत करतात. यांच्या मदतीने तुम्ही तुमची आवडती कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. तुमच्या ड्रीम कारला आर्थिक मदत करण्यासाठी ऑटोलोन घेतांना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यामुळे आपले आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो.

* तुमची क्रेडिट हिस्ट्री तपासा

एका अहवालात असे म्हंटले आहे की कारसाठी लोन घेण्यापूर्वी क्रेडिट स्कोअरची माहीती करून घेणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकाला त्याचा क्रेडिट स्कोअर माहीत असेल तो कोणत्या कर्जाच्या अटींसाठी पात्र आहे आणि कर्ज (Loan) मिळू शकते की नाही हे समजते. आजकाल कर्ज देताना क्रेडिट स्कोअरची तपासणी केली जाते. तसेच, अनेक बँका (Bank) यावर आधारित व्याजदर देतात, त्यामुळे परवडणारे कर्ज मिळविण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर माहिती असणे आवश्यक आहे.जर क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि खरेदीसाठी गर्दी नसेल तर ग्राहक (Customer) चांगला व्याजदर मिळवण्यासाठी स्कोअर सुधारण्याचा निर्णय घेऊ शकतो. ग्राहक त्याच्या क्रेडिट कार्ड (Credit card) स्टेटमेंट किंवा ऑनलाइन खात्यावर त्याचा क्रेडिट स्कोअर सहजपणे मिळवू शकतो.

दीर्घ मुदतीसाठी कर्ज घेऊ नका

दीर्घकालीन कर्जाचा पर्याय ग्राहकांसाठी आकर्षक असू शकतो कारण त्यात कमी इएमआय भरणे सामाविष्ट असते, परंतु एकूण व्याज वाढते. दीर्घकालीन सहसा जास्त व्याजदर येतो आणि ग्राहकाला दीर्घ कालावधीसाठी इएमआय भरावे लागते. तसेच, दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजे कारचे मूल्य देखील कमी होते. समान्यत: 60 महीने हा जास्तीत जास्त कालावधी मनाला जातो ज्याचा विचार केला पाहिजे.

प्री-अप्रूव्ड लोन घ्यावे

कर्जासाठी (Loan) फक्त कार डीलर्सवर अवलंबून राहण्याएवजी, तुम्ही सवलती उपलब्ध असलेल्या इतरत्र चांगले पर्याय शोधू शकता. वेगेवगळ्या बँका (Bank) , क्रेडिट एजन्सी आणि ऑनलाइन कर्जदारांकडून पूर्व-मंजूर कर्जे तपासणे केव्हाही चांगले. कार खरेदी करण्यापूर्वी हे केले पाहिजे कारण यामुळे खरेदीदाराला किती कर्ज मंजूर केले जाऊ शकते आणि ग्राहकांसाठी व्याजदर काय असतील यांची कल्पना येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT