Kawasaki Ninja ZX-10R Dainik Gomantak
अर्थविश्व

Kawasaki Ninja ZX-10R: स्पोर्ट्स रायडर्ससाठी खास,भारतात लाँच झाली नवी कावासाकी निन्जा ZX-10R; किंमत किती? काय आहे खास? वाचा

Kawasaki Ninja ZX-10R Launched: कावासाकीने भारतात त्यांची सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक निन्जा ZX-10R चे २०२६ मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे.

Sameer Amunekar

कावासाकीने भारतात त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असलेल्या स्पोर्ट्स बाईकमधील निन्जा ZX-10R चे २०२६ मॉडेल अधिकृतपणे लाँच केलं आहे. हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत खास सुपरबाईक प्रेमींसाठी सादर करण्यात आले असून त्यात काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. या नव्या मॉडेलची किंमत मागील आवृत्तीपेक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, इंजिनच्या बाबतीत कंपनीने कोणताही बदल केलेला नाही.

इंजिन आणि परफॉर्मन्स

२०२६ निन्जा ZX-10R मध्ये पुन्हा एकदा जुनेच ९९८ सीसी, इनलाइन-फोर इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनसह बाईक रॅम एअर वापरल्यास २०२ एचपीपर्यंत पॉवर निर्माण करते, तर साध्या स्थितीत ती सुमारे १९३.३ एचपी पॉवर निर्माण करते. टॉर्क आउटपुट ११२ एनएम पर्यंत आहे, जो आधीच्या मॉडेलपेक्षा किंचित कमी आहे. म्हणजेच, टॉर्क सुमारे २.९ एनएम आणि पॉवर सुमारे ७ एचपीने कमी झाली आहे.

किंमत

या बाईकच्या किंमतीत मोठा बदल करण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १८.५० लाख रुपये होती, तर नवीन २०२६ मॉडेलची किंमत आता १९.४९ लाख रुपये झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना सुमारे ९९,००० रुपये जास्त मोजावे लागतील.

सस्पेंशन आणि ब्रेकिंग

कावासाकी निन्जा ZX-10R मध्ये नेहमीप्रमाणेच उच्च दर्जाचे सस्पेंशन दिले गेले आहे.

  • शोवा BFF फ्रंट फोर्क्स

  • BFRC रियर मोनोशॉक

  • ड्युअल ३३० मिमी फ्रंट डिस्क

  • सिंगल २२० मिमी रियर डिस्क ब्रेक

फीचर्स

या बाईकमध्ये रायडर्ससाठी अनेक अॅडव्हान्स वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत.

  • फुल-टीएफटी डिस्प्ले

  • स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी

  • मल्टीपल रायडिंग मोड्स

  • लॉन्च कंट्रोल

  • ट्रॅक्शन कंट्रोल

  • ड्युअल-चॅनेल ABS

२०२६ कावासाकी निन्जा ZX-10R भारतात अधिकृतपणे उपलब्ध झाली आहे. किंमतीत वाढ झाली असली आणि परफॉर्मन्स किंचित कमी झाला असला, तरी फीचर्स, डिझाईन आणि रेसिंग अनुभवामुळे ही बाईक स्पोर्ट्स रायडर्ससाठी अजूनही एक प्रीमियम पर्याय ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT